धुळे पोलिसांकडून अवघ्या 24 तासात सोनसाखळी चोर जेरबंद भूषण अहिरे
महाराष्ट्र

धुळे पोलिसांकडून अवघ्या 24 तासात सोनसाखळी चोर जेरबंद

गेल्या काही दिवसांमध्ये धुळे शहरात सोनसाखळी चोरांनी उच्छाद मांडला आहे. या सोनसाखळी चोरांना आवर घालण्यासाठी धुळे पोलिसांतर्फे सर्वोतोपरी प्रयत्न देखील केले जात आहेत.

भूषण अहिरे

धुळे : गेल्या काही दिवसांमध्ये धुळे शहरात सोनसाखळी चोरांनी उच्छाद मांडला आहे. या सोनसाखळी चोरांना आवर घालण्यासाठी धुळे पोलिसांतर्फे सर्वोतोपरी प्रयत्न देखील केले जात आहेत. अश्यातच धुळ्यात एक महिला कचरा टाकण्यासाठी घराबाहेर पडली असता चोरट्यांनी दुचाकीवरुन येत तिच्या गळ्यातील सोन्याची चैन हिसकावून पोबारा केला.

या घटनेनंतर धुळे परिसरात एकच खळबळ उडाली. याप्रकरणी धुळे पोलिसांनी तपासचक्रे वेगाने फिरवत दोन्ही सोनसाखळी चोरांना अवघ्या 24 तासात बेड्या ठोकत गजाआड केले आहे.

हे देखील पहा -

धुळे शहरातील साक्री रोड येथील कुंभारनगर येथे ताराबाई माधवराव कुंडल वास्तव्यास आहेत. ताराबाई काल (23 जुलै) कचरा फेकण्यासाठी घराबाहेर पडल्या. पण दोन सोनसाखळी चोरटे हे त्याठिकाणी दबा धरुन बसले होते. त्यांनी ताराबाई रसत्यावर आल्याचं बघितलं. त्यानंतर ताराबाईच्या दिशेने वेगाने दुचाकी नेली. या दरम्यान मागे बसलेल्या तरुणाने ताराबाई यांच्या गळ्यातील सोनसाखळी खेचली. त्यानंतर दुचाकीचा वेग वाढवून आरोपी पळून गेले. यादरम्यान ताराबाई या जमिनीवर पडल्या तिथे उपस्थित असलेल्या नागरिकांनी त्यांना सावरले.

यासंदर्भात शहर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी या तक्रारीचा गांभीर्याने विचार करीत तपासाची चक्रे वेगाने फिरवत अवघ्या 24 तासात चोरट्यांचा मुसक्या आवळल्या. तसेच त्यांच्याकडून 50 हजार रुपये किंमतीची चैन जप्त केली. या दोन भामट्यांच्या शहर पोलिसांनी मुसक्या आवळल्या असून यामागे टोळी सक्रिय असण्याची शक्यता गृहीत धरून त्या अनुषंगाने पोलीस तपास करत आहेत.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: ८ हजार सरकारी कर्मचाऱ्यांनी घेतला 'लाडकी'चा लाभ, सरकार प्रत्येकी ₹२१००० परत घेणार

Budget Plan: जिओनंतर 'या' कंपनीने दिला धक्का! लोकप्रिय आणि स्वस्त रिचार्ज प्लॅन आता बंद

Zodiac signs' fate: ललिता पंचमीमुळे आजचे योग शुभ, जाणून घ्या कोणत्या राशींवर लाभ

Maharashtra Live News Update: पंढरपूरात अतिवृष्टीचा अंदाज, सीना नदीला पुन्हा पुराचा धोका; नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Maharashtra Rainfall: नागरिकांनो सतर्क राहा! आजपासून पाऊस पुन्हा जोर धरणार, कोकण- विदर्भ अन् मराठवाड्यात जोरदार बॅटिंग

SCROLL FOR NEXT