Dhule Engineering Student Death saam tv
महाराष्ट्र

Student Death : इंजिनियरिंगचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याची आत्महत्या, काॅलेजच्या हॉस्टेलमध्ये गळफास घेत आयुष्य संपवलं

Engineering Student Death : धुळ्यामधील सावळदे जवळील एस व्ही के एमच्या निम्स कॉलेजमधील इंजिनियरिंगचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Yash Shirke

  • धुळ्यात निम्स कॉलेज विद्यार्थ्याची आत्महत्या.

  • हॉस्टेलमध्ये गळफास घेत स्वत:ला संपवलं

  • आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट, पोलिसांकडून तपास सुरु.

भूषण अहिरे, साम टीव्ही, प्रतिनिधी

Dhule News : धुळे जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना घडली आहे. धुळ्यातील इंजिनियरिंगचे शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. या विद्यार्थ्याने गळफास घेत आयुष्य संपवल्याचे म्हटले जात आहे. तरुणाच्या आत्महत्येच्या बातमीमुळे कॉलेज परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्याच्या सावळदे जवळील एस व्ही के एसच्या निम्स कॉलेजमधील विद्यार्थ्याने आत्महत्या केली आहे. कॉलेजच्या परिसरात विद्यार्थ्यांना राहण्यासाठी हॉस्टेलची सोय आहे. या हॉस्टेलमध्ये गळफास घेत या विद्यार्थ्याने स्वत:चा जीव घेतला. आत्महत्येमागील कारण अद्याप अस्पष्ट आहे.

काॅलेजच्या हॉस्टेलमध्ये आत्महत्या करणाऱ्या इंजिनियरिंगच्या विद्यार्थ्याचे नाव अथर्व राजपुरोहित असे आहे. तो निम्स येथे कॉम्प्युटर इंजिनियरिंगचे शिक्षण घेत होता. अथर्व राजपुरोहित हा मूळचा मध्यप्रदेश राज्यातील खरगोन येथील रहिवासी आहे. या घटनेनंतर घटनास्थळी पोहोचून शिरपूर पोलिसांनी तपास करायला सुरुवात केली आहे.

धुळे जिल्ह्यातील सावळदे जवळील एस व्ही के एमच्या निम्स कॉलेजमधील विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याचे वृत्त समोर आले आहे. त्याने हॉस्टेलमध्ये गळफास घेत आत्महत्या केली. या विद्यार्थ्याने आत्महत्या का केली याचे कारण अजूनही समोर आलेले नाही. या घटनेमुळे कॉलेजच्या विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

एस व्ही के एमच्या निम्स कॉलेजचे आवाहन -

NMIMS शिरपूर येथील एका विद्यार्थ्याच्या निधनामुळे आम्ही अतिशय दुःखी आहोत. या कठीण काळात आमच्या संवेदना त्याच्या कुटुंबीय, मित्रपरिवार आणि सर्व संबंधित व्यक्तींना व्यक्त करतो. या घटनेच्या संदर्भात काही अफवा आणि निराधार दावे पसरत असल्याची आम्हाला जाणीव आहे. मात्र, या क्षणी सर्वांत महत्त्वाचे म्हणजे आपण दिवंगत विद्यार्थ्याच्या प्रतिष्ठेला कुठलाही धक्का लागू न देता अत्यंत जबाबदारीने वागणे. आम्ही या प्रकरणाची गांभीर्याने आणि तत्परतेने दखल घेतली आहे. NMIMS चे नेतृत्व त्वरित सक्रिय झाले असून आज सकाळी शिरपूरकडे रवाना झाले आहे. या प्रकरणातील सर्व तथ्यांची चौकशी करण्यासाठी अंतर्गत तपास सुरू करण्यात आला आहे. तसेच, मूळ कारण ओळखण्यासाठी आम्ही संबंधित कायदा अंमलबजावणी यंत्रणांशी जवळून समन्वय साधत आहोत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Blood Pressure: BP च्या गोळ्यांमुळे किडनी खराब होते का? जाणून घ्या तज्ज्ञांनी सांगितलेली खरी माहिती

Tharala Tar Mag: 'ठरलं तर मग'मध्ये अखेर उलगडणार सर्वात मोठं रहस्य; सायलीच आहे खरी तन्वी, मधुभाऊंनी दिला इशारा!

Maharashtra News Live Update : मोफत सोयाबीन बियाणे वाटपादरम्यान आष्टी तालुका कृषी कार्यालयात गोंधळ

Chapati Recipe : पावसाळ्यात चपाती थंड झाल्यावर कडक होते? फॉलो करा 'ही' रेसिपी, मिळतील मऊ-लुसलुशीत पोळ्या

Sleep deprivation effects: ही ६ लक्षणं दिसली तर समजा तुमच्या शरीराला पुरेशी झोप मिळत नाही, ४ कारण हादरवणारं

SCROLL FOR NEXT