भाजप 
महाराष्ट्र

भाजपच्या विजयाचा गुलाल पोहोचला पोलीस ठाण्यात..दोन विजयी उमेदवारांवर गुन्हे दाखल

विजयाचा गुलाल उतरत नाही तोच भाजपच्या विजयी उमेदवारांवर गुन्हे दाखल

भूषण अहिरे

धुळे : जिल्‍हा परिषद व पंचायत समितीच्‍या पोट निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. या निकालानंतर विजयाचा गुलाल उधळला. गुलाल उधळून झाल्यानंतर शिरपूर व नगाव येथील भाजपच्या दोन विजयी उमेदवारांवर संबंधित पोलिस ठाण्यांमध्ये विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (dhule-news-zilha-parishad-election-win-two-bjp-candidate-police-fir)

पोट निवडणुकीत विजय मिळविल्‍यानंतर विजयाचा जल्लोष साजरा करत असताना शिरपूर तालुक्यातील शिंगावे गणातील भाजपचे विजयी झालेले उमेदवार चंद्रकांत पाटील यांच्या कार्यकर्त्यांतर्फे जल्लोष साजरा केला. पराजित उमेदवारांसोबत कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या राड्यानंतर विजयी उमेदवार चंद्रकांत पाटील यांच्यासह दहा जणांवर शिरपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महिला उमेदवाराकडे बघून अर्वाच्य भाषेत चाळे

दुसरीकडे धुळे तालुक्यातील नगाव येथील विजयी उमेदवार राम भदाणे यांचा देखील विजयी जल्लोष सुरू असताना पराजित झालेल्या विरोधी गटातील महिला उमेदवाराकडे बघून अर्वाच्य व अश्लील चाळे केल्याबद्दल देवपूर पोलिस ठाण्यात विजय उमेदवाराच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विजयाचा गुलाल उतरेपर्यंत धुळे जिल्ह्यातील भाजपच्या 2 विजयी उमेदवारांवर गुन्हे दाखल झाल्याने राजकीय वातावरणात खळबळ उडाली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalgaon Crime : विभक्त राहत असलेल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय; पतीचा घरात घुसून पत्नीवर प्राणघातक हल्ला

STD, ISD आणि PCO चा फुलफॉर्म काय? या तिघांमधील फरक तुम्हाला माहितीये का? जाणून घ्या एका एका क्लिकवर

Maharashtra Election : भाजपला सर्वाधिक ताकद कोण देणार? किंगमेकरसाठी शिंदे-दादांमध्ये स्पर्धा?

VIDEO: संभ्रम नाहीच, तुमच्या हिताचा निर्णय तुम्ही घ्या, पण.. ; जरांगेंनी स्पष्ट केली भूमिका

Garlic Benefits: रोज लसणाची एक पाकळी खाल्ल्याने काय बदल होतात?

SCROLL FOR NEXT