शिंदखेडा (धुळे) : सत्ताधारी पक्षाच्या विरोधात घोषणा देत आज (ता. २९) नगरपंचायतीच्या विरोधी पक्षातर्फे शहरात निर्माण झालेल्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर नगरपंचायत कार्यालयावर हंडा मोर्चा काढण्यात आला. शिवाजी चौकापासून सकाळी दहाला मोर्चास सुरुवात झाली आणि गांधी चौकातून नगरपंचायत कार्यालयावर हा मोर्चा नेण्यात आला. नगरपंचायतीचे मुख्याधिकारी प्रशांत बिडकर यांना मागणीचे निवेदन देण्यात आले. (dhule-news-Water-scarcity-in-Shindkheda-during-Opposition's-Handa-Morcha-nagarpanchayat)
शिंदखेडा शहरात गेल्या पंधरा दिवसापासून पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. २१ कोटी रुपये खर्चाची पाणी योजना कार्यान्वित असताना आणि पाणीसाठाही मुबलक असताना केवळ नगरपंचायतीच्या बेजबाबदारपणामूळे शहराला ऐन पावसाळ्यात गेल्या पंधरा दिवसापासून पाणीटंचाईने सामोरे जावे लागत आहे. असा आरोप विरोधी गटाने केला आहे. नगरपंचायतीच्या विरोधी गटाने नगरपंचायती वर हंडा मोर्चा काढण्यात आला. शहरालापाणी पुरवठा त्वरित सुरू न झाल्यास तीव्र स्वरूपाचे जन आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला. निवेदन मुख्याधिकाऱ्यांना देण्यात आले. मोर्चामध्ये विरोधी पक्षाचे गटनेते तथा माजी प्रभारी नगरअध्यक्ष दीपक देसले, विरोधी पक्षनेते सुनील चौधरी, नगरसेवक उदय देसले, दीपक अहिरे, किरण थोरात, संगीताबाई भिल, दिनेश माळी, सुमित जैन, राष्ट्रवादी पक्षाचे शहराध्यक्ष प्रवीण पाटील, शिवसेनेचे संतोष देसले, गोलू देसले, मिलिंद देसले, इंटक काँग्रेसचे समद शेख, वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष राहुल पाटोळे, महाविकास आघाडीचे अन्य कार्यकर्ते मोर्चात सहभागी झाले होते.
सुलवाडे बॅरेजचे दरवाजे उघडल्याने पाण्याची पातळी कमी झाली. नदीतील विद्युत मोटारी बंद पडल्या त्यामुळे पाणी टंचाई निर्माण झाली होती. आता पातळी वाढल्याने पाणीपुरवठा पूर्ववत सुरू झाला आहे. लवकरच जॅकवेल वरील एक्सप्रेस फिटरचे काम पूर्ण होईल व शहराला नियमित पाणीपुरवठा सुरू होईल. नागरिकांनी याबाबत सहकार्य करावे.
- रजनी वानखेडे, नगराध्यक्षा, शिंदखेडा
दरवर्षीच तापी नदीला पूर येत असतो. त्यात विद्युत मोटारी बंद पडतात, हा पूर्वानुभव असतानाही यावेळी जागृत राहून नगरपंचायत प्रशासनाने शिंदखेडा शहरालगत असलेला केटीवेअर आधीच भरून घ्यायला पाहिजे होता. तसे केले असते तर नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागले नसते.
- दीपक देसले, विरोधी पक्षाचे गटनेते
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.