Dhule Shirpur Accident Saam TV
महाराष्ट्र

Dhule Accident : भयंकर! भरधाव ट्रकने क्रुझरला उडवलं; २० ते २५ जण जखमी

धुळे जिल्ह्यातून अपघाताची एक भयंकर घटना समोर आली आहे.

भूषण अहिरे

Dhule - Shirpur : धुळे जिल्ह्यातून अपघाताची एक भयंकर घटना समोर आली आहे. भरधाव वेगात येणाऱ्या ट्रकचे अचानक समोरील टायर फुटले. त्यानंतर ट्रक अनियंत्रित झाला. त्याने थेट समोरील क्रुझरला धडक दिली. धडक इतकी भीषण होती. ट्रक थेट तापी नदीपात्रात कोसळला. सोमवारी (२३ जानेवारी) रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. (Breaking Marathi News)

या भीषण अपघातात क्रुझरमधील २० ते २५ जण जखमी झाल्याची माहिती आहे. धुळे (Dhule) जिल्ह्यातील शिरपूर शिवारात हा अपघात झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच, पोलिसांसह स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केलं आहे.

अपघातातील जखमींना उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. रात्रीची वेळ आणि अंधार असल्याने बचावकार्यात मोठी अडचण येत आहे. त्यातच तापी नदीला मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने ट्रकमधील चालक वाहकांना शोधण्याचं काम सुरू आहे. ट्रकमध्ये किती जण होते. याची माहिती अद्यापही समोर आलेली नाही.

प्राप्त माहितीनुसार, अपघातग्रस्त (Accident) क्रुझर शिरपूरच्या दिशेने जात होती. त्याचवेळी भरधाव ट्रकही त्याच दिशेने जात होता. दरम्यान, दोन्ही वाहने तापी नदीच्या पूलावर आली असता, अचानक ट्रकचे समोरील टायर फुटले आणि ट्रकने थेट समोरील क्रुझरला धडक दिली.

या भीषण अपघातात २० ते २५ जण जखमी झाले. तर ट्रकमधील चालक-क्लिनर पाण्यात बुडाले. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी (police) नागरिकांच्या मदतीने जखमी झालेल्या प्रवाशांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं आहे. जखमींपैकी १० ते १५ जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: माझं आणि जरांगेचं वैर नाही - धनंजय मुंडे

Dhananjay Munde: मला मारण्यासाठी अडीच कोटींची सुपारी, जरांगेंच्या आरोपावर धनंजय मुंडेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

Dry Lips Care: तुमचेही ओठ खूपच कोरडे होतायेत? या सोप्या टिप्स करा फॉलो

Budh Gochar 2025: डिसेंबर महिन्यात २ वेळा गोचर करणार राजकुमार बुध; 'या' ३ राशींच्या व्यक्ती होणार करोडपती

Lehenga Selection: लग्नसराईसाठी लेहेंगा खरेदी करायचा आहे? मग शॉपिंगला गेल्यावर 'या' गोष्टींची घ्या काळजी

SCROLL FOR NEXT