Gutkha Transport 
महाराष्ट्र

धान्याच्या आडून गुटख्याची वाहतूक

धान्याच्या आडून गुटख्याची वाहतूक

भूषण अहिरे

धुळे : परराज्यांतून महाराष्ट्रात विविध मार्गांनी बंदी असलेल्या गुटख्यासह सुगंधी तंबाखूची बेकायदेशीर तस्करी होत आहे. यातच धान्याच्या आडून गुटख्याची अवैधपणे वाहतूक होत असल्‍याचे समोर आले असून अशी वाहतुक करणाऱ्या ट्रकसह मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत करीत दोघांच्या मुसक्या आवळल्या.

गव्हाच्या पोत्यांआडून गुटखा व सुगंदी तंबाखूची मध्यप्रदेशातून (Madhya Pradesh) धुळ्याकडे येणाऱ्या वाहनातून वाहतूक होत असल्याची माहिती एलसीबीचे निरीक्षक शिवाजी बुधवंत यांना मिळाली. त्यानुसार सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रकास पाटील यांच्यासह पथकाने हाडाखेड सीमा तपासणी नाक्यावर सापळा रचला. त्यावेळी सेंधव्याकडून येणाऱ्या तपकिरी रंगाचा ट्रक (सीजी ०४, एमएस, १८०७) संशयावरून थांबविला. त्यात चालक अजीम वाहिद शेख व सहचालक अक्रम शब्बीरअली हे बसलेले होते. त्यांच्याकडे ट्रकमधील मालाबाबत चौकशी केली असता त्यांनी त्यात गहू असल्याचे सांगितले. त्याची पावती व ई-वे बिलही दाखविले. तरीही पोलिसांनी वाहनाची तपासणी केली असता त्यात गव्हाच्या गोण्यांखाली गुटखा व सुगंधी तंबाखूची पाकिटे आढळली.

साडेतेवीस लाखाचा मुद्देमाल जप्‍त

एलसीबीचे पोलिस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार हाडाखेड सीमा तपासणी नाक्यावर सापळा रचत १८ लाख ५० हजारांचा गुटखा, सुगंधी तंबाखूसह गव्हाची पोती वाहून नेणारा पाच लाखांचा आयशर ट्रक असा एकूण २३ लाख ५१ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. वाहनचालकासह सहचालकाला पथकाने ताब्यात घेतले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Success Story: रिलस्टार ते डेप्युटी कलेक्टर! दुसऱ्या प्रयत्नात केली MPPSC क्रॅक; हर्षिता दवे यांचा प्रवास

Maharashtra Live News Update : नगरमधील पॅथॉलॉजिकल लॅबचे तज्ञ डॉक्टरांवर गंभीर गुन्हे दाखल

राज ठाकरे राजकारणातील नापास माणूस; अजित पवारांच्या पायाची धूळ, सदावर्तेंनी पुन्हा डिवचलं

Smriti Mandhana Marriage: स्मृती मानधनाचं ठरलं! कोणाशी बांधणार लगीनगाठ?

Kalyan : कल्याणमध्ये केडीएमसीच्या घंटागाडीची दुचाकीला धडक; दुचाकीस्वार गंभीर जखमी, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT