ssc student saam tv
महाराष्ट्र

Dhule: धुळ्यात दहावी– बारावीचे विद्यार्थी आक्रमक

धुळ्यात दहावी– बारावीचे विद्यार्थी आक्रमक

भूषण अहिरे

धुळे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाइन पद्धतीने दहावी- बारावीच्या विद्यार्थ्यांना अभ्यास करावा लागला. आता शिक्षण मंत्र्यांनी दहावी बारावीच्या परीक्षा संदर्भात ऑफलाइन पद्धतीने परीक्षा (Online Exam) घेण्याचा निर्णय घेतल्याची अफवा पसरली. यावरून दहावी बारावीचे विद्यार्थी आक्रमक झाल्याचे बघावयास मिळाले. (dhule news Tenth twelfth grade students are aggressive in Dhule)

कोरोनामुळे (Corona) शाळा बंद असल्‍याने वर्षभर ऑनलाईन पद्धतीने लेक्चर तसेच अभ्यास केल्यानंतर ऑफलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यात येईल; अशी अफवा पसरली होती. हा घाट शिक्षण मंत्र्यांकडून का घेण्यात येत आहे? असा प्रश्न यानिमित्ताने या विद्यार्थ्यांनी उपस्थित केला.

मग परीक्षाही ऑनलाईनच हवी

अभ्यास ऑनलाईन पद्धतीने (Online Education) झाला आहे; तर ऑफलाइन पद्धतीने परीक्षा घेण्याचा निर्णय शिक्षण विभागाने बदलावा व ऑनलाईन पद्धतीने दहावी व बारावीची परीक्षा घेण्यात यावी, अशी मागणी या आक्रमक विद्यार्थ्यांनी केली आहे. यासंदर्भात धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात असलेल्या क्यूमाईनक्लब परिसरात दहावी- बारावीच्या विद्यार्थ्यांनी निदर्शने केले. तसेच या संदर्भात जिल्हाधिकार्‍यांना याबाबतचे निवेदन देखील या विद्यार्थ्यानतर्फे देण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Relationship Tips: नवरा बायकोचं लग्नानंतर बोलणं कमी झालंय? 'या' टिप्स करा फॉलो, नातं होईल घट्ट

Bhakri Making Tips : भाकरी थापताना तुटते? टेन्शन घेऊ नका, फक्त 'या' सोप्या टिप्स वापरा

लाडक्या बहिणींना नवीन वर्षाचं गिफ्ट, 2100 नाहीतर 4500 मिळणार|VIDEO

Maharashtra Politics: अंबरनाथमध्ये EVM आणणाऱ्या कर्मचाऱ्यांकडे बोगस आयडी कार्ड, शिवसेना-काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक

Anushka Sharma Looks Like: 'वहिनीपेक्षा ही क्युट...'; पाकिस्तानी तरुणी दिसते सेम अनुष्कासारखी, व्हिडिओ पाहून विराटला केलं टॅग

SCROLL FOR NEXT