Dhule Temperature Saam tv
महाराष्ट्र

Dhule Temperature : धुळ्यात तापमानाचा पारा वाढलेलाच; तापमान ४२.५ अंशांवर

Dhule News : धुळ्यात उष्णतेची लाट अद्यापही कायम आहे. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने ४२ अंशांपेक्षा जास्त तापमानाची नोंद धुळ्यात केली जात आहे.

भूषण अहिरे

धुळे : मागील काही दिवसांपासून तापमानाचा पारा वाढतच आहे. यामुळे असह्य अशा उष्णतेच्या झळा जाणवत आहेत. मागील आठवड्यापासून धुळ्यात वाढलेले तापमान आज देखील कायम राहिले असून धुळ्यात आज ४२.५ अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे. 

धुळ्यात (Dhule) उष्णतेची लाट अद्यापही कायम आहे. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने ४२ अंशांपेक्षा जास्त तापमानाची नोंद धुळ्यात केली जात आहे. या वाढत्या तापमानामुळे उष्णतेच्या झळा अधिक तीव्र झाल्याचा अनुभव धुळेकरांना मागील काही दिवसांपासून येत आहे. या वाढत्या तापमानाचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत असून तापमान (Temperature) वाढीमुळे काही जणांना उष्मघाताचा देखील त्रास झाल्याचे पाहण्यास मिळाले. 

तापमान कायम 

आठवडाभरापासून स्थिर असलेले तापमान आज देखील कायम राहिले. धुळ्यात आज ४२.५ अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून हा तापमानाचा पारा अशाच प्रकारे कायम असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान आज रविवार असल्याने शहरातील सर्वच रस्त्यांवर शुकशुकाट पाहण्यास मिळाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fried Modak Recipe: गणेश चतुर्थीच्या निमित्ताने गणरायासाठी बनवा खुसखुशीत स्वादिष्ट तळणीचे मोदक; वाचा सोपी रेसिपी

Mysterious Fort : सोनं-चांदीने भरलेल्या विहिरी! 'या' किल्ल्यातील गुप्त खजिन्याचं रहस्य आजही कायम

इबोलाचा उद्रेक; मृतांचा आकडा ३,००० च्या पार, WHO ने दिला मोठा इशारा

Kitchen Vastu Tips: घरातील किचनविषयी 5 महत्त्वाच्या गोष्टी ज्या प्रत्येकाला माहित असायला हव्यात

Thursday Horoscope : अचानक धनलाभ होणार, ५ राशींची होणार चांदी; वाचा गुरूवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT