Temperature
Temperature Saam tv
महाराष्ट्र

धुळ्यात तापमानाचा पारा वाढला; ४४ अंश सेल्सिअसची नोंद

भूषण अहिरे

धुळे : धुळे जिल्ह्यामध्ये गेल्या महिन्याभरापासून चाळीस अंशापेक्षा जास्तीचे तापमान नोंदविण्यात येत आहे. आज धुळ्यामध्ये तापमानाचा पारा आणखीनच वाढला असून जवळपास 44 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची (Temperature) नोंद करण्यात आली आहे. (Dhule news temperature mercury increased today)

गेल्या आठवडाभरापासून (Dhule News) तापमानामध्ये घट झाल्याचे बघावयास मिळत होते. परंतु आज अचानक तापमानात आणखीनच वाढ झाल्यामुळे धुळेकरांच्या अंगाची लाही लाही होताना दिसून येत आहे. वाढत्या उष्णतेचा परिणाम नागरिकांच्या शरीरावर जाणवू लागला असून उन्हाच्या वाढत्या झळांचा त्रास देखील नागरिकांना जाणवत आहे. त्यामुळे धुळेकर नागरिक वाढत्या उष्णतेमुळे चांगलेच हैराण झाले आहेत.

पुढचे पाच दिवस लाट

हवामान विभागातर्फे पुढील चार ते पाच दिवस तापमानाचा पारा आणखी वाढण्याची शक्यता वर्तविली आहे, यामुळे पुढील चार ते पाच दिवसात धुळ्याच्या तापमानाचा पारा आणखी किती पर्यंत पोहोचतो याकडे धुळेकरांचे लक्ष लागून राहिले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime: कात्रज,स्वारगेट परिसरात दोन जणांचा खून; शिवीगाळ केल्याच्या वादातून एकाने डोक्यात घातला दगड

Maharashtra Drought: राज्यात पाणीटंचाईच्या झळा तीव्र; नद्या आटल्या, विहिरी कोरड्याठाक, हंडाभर पाण्यासाठी वणवण

Lok Sabha Election: तिसरा टप्पा BJP साठी महत्त्वाचा, 2019 मध्ये याच टप्प्यात मिळालं होतं मोठं यश; यंदा काय आहे राजकीय परिस्थिती?

MI vs SRH,IPL 2024: हैदराबादवर सूर्या कोपला! शतकी खेळीनं मुंबईच्या लल्लाटी विजयी 'तिलक', प्ले ऑफची समीकरणंच विस्कटली

Esha Gupta च्या बोल्ड फोटोंची एकचं चर्चा, फोटो पाहून चाहते थक्क

SCROLL FOR NEXT