महाराष्ट्र

तापमान घसरले; धुळ्यात निचांकी तापमानाची नोंद

तापमान घसरले; धुळ्यात 8.5 अंश सेल्सिअसची नोंद

भूषण अहिरे

धुळे : मागील दोन- तीन दिवसांपासून तापमानात घसरण होऊन थंडीचा जोर वाढू लागला आहे. यात धुळ्यात आज 8.5 अंश सेल्सिअस इतक्या नीचांकी तापमानाची नोंद करण्यात आली आहे.

आठवडाभरापूर्वी ढगाळ वातावरणामुळे थंडी गायब झाली होती. उलट सकाळी अन रात्री देखील गरमी वाढली होती. परंतु दोन दिवसांपासून थंडी पुन्हा वाढली आहे. धुळ्यात आज 8.5 अंश सेल्सिअस इतक्या नीचांकी तापमानाची नोंद करण्यात आली आहे.

दिवसभरात एक अंशाने घसरण

या वर्षातील हे सर्वांत नीचांकी तापमान आहे. कालच्या तुलनेत देखील आज एक अंशाने तापमानाचा पारा घसरला असून हवेमध्ये प्रचंड गारवा निर्माण झाला असल्याने थंडीचा जोर आणखीनच वाढल्याचे बघावयास मिळत आहे. त्यामुळे घराबाहेर पडणाऱ्या धुळेकरांना स्वेटर, टोपी, मफलर अशा उबदार कपड्यांचा आधार घ्यावा लागत आहे. तापमानामध्ये झालेल्या घसरणीमुळे धुळेकर मात्र चांगलेच गारठले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

तिकीट कन्फर्म पण एक मिनिटांनी ट्रेन सुटली, तर रिफंड मिळतो का? रेल्वेचे नियम जाणून घ्या

Health Tips : ऑफिसमध्ये काम करताना सतत झोप येते? यामागे असू शकतात ही ७ कारणं

नवरा-बायकोचं नातं मजबूत ठेवण्यासाठी रोज करा या 7 गोष्टी

Maharashtra News Live Update: नवी मुंबई क्लस्टर योजनेवर गणेश नाईक यांचे ताशेरे

Sugar Avoid: वजन कमी करण्यासाठी साखर खाणं कमी करायची आहे? मग फॉलो करा 'या' ७ सोप्या टिप्स

SCROLL FOR NEXT