Dhule News Saam tv
महाराष्ट्र

Dhule News : नारायण राणे व रामदास कदमांची काढली प्रतीकात्मक अंत्ययात्रा; मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने निषेध

भूषण अहिरे

धुळे : मराठा आरक्षणासाठी सुरु असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी धुळ्यात (Dhule) मराठा क्रांती मोर्चातर्फे आंदोलन सुरु करण्यात आले आहे. या दरम्यान आज केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) व रामदास कदम यांची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढत निषेध व्यक्त करण्यात आला. (Tajya Batmya)

मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळावे या मागणीसाठी गेल्या काही दिवसांपासून मराठा क्रांती मोर्चाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू आहे. त्यांना पाठिंबा देण्यासाठी धुळ्यात देखील मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने उपोषण सुरू आहे. आज मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने मंत्री नारायण राणे त्याचबरोबर रामदास कदम (Ramdas Kadam) यांच्या प्रतीकात्मक प्रेतयात्रा आज काढण्यात आल्या. ही प्रेतयात्रा काढत या दोघेही नेत्यांचा निषेध यावेळी मराठा समाजाच्या वतीने मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने करण्यात आला आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दोघांविरोधात तीव्र घोषणाबाजी 
अंत्ययात्रा काढत असताना या दोघेही नेत्यांच्या विरोधामध्ये तीव्र घोषणाबाजी यावेळी मराठा आंदोलकांतर्फे करण्यात आली. ही प्रेतयात्रा धुळे महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर आणून त्या ठिकाणी या दोघेही नेत्यांचे प्रतीकात्मक फोटोचे दहन करून, त्यांची प्रतीकात्मक प्रेतयात्रा ही जाळण्यात आली आहे. यावेळी मराठा समाजाच्यावतीने या दोघेही नेत्यांच्या विरोधामध्ये मोठ्या प्रमाणात तीव्र घोषणाबाजी करून निषेध व्यक्त करण्यात आला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss Marathi : अरबाज-निक्कीच्या जोडीने पुन्हा मारली बाजी; प्रतिस्पर्धी सलग दुसऱ्यांदा बॅकफुटवर; नेमकं काय घडलं?

Nashik News : नाशिकमध्ये ५ पेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास बंदी; आजपासून १५ दिवस मनाई आदेश, काय आहे कारण?

Vivo V40e चा धमाका; लॉन्चच्या आधीच किंमत आणि फीचर्सबाबत मोठी अपडेट आली समोर

Viral Video : भरवर्गात विद्यार्थ्यांची हाणामारी, आवाज ऐकताच शिक्षिका आली धावत; पुढे काय घडलं? तुम्हीच पाहा

Mumbai News: धक्कादायक! वांद्रे वरळी सी-लिंकवरून उडी मारुन कॅब चालकाची आत्महत्या; कारण काय?

SCROLL FOR NEXT