Dhule Suicide Case Saam tv
महाराष्ट्र

Dhule: मित्रांना सांगितले अन्‌ तरुणाची नदीत उडी

मित्रांना सांगितले अन्‌ तरुणाची नदीत उडी

साम टिव्ही ब्युरो

धुळे : शहरातील गरूड कॉलनीतील २८ वर्षीय तरुणाने बुधवारी (ता. २८) सकाळीश्री कालिकामाता मंदिराजवळील पांझरा नदीवरील मोरी पुलावरून उडी घेतली. अनेक नागरिकांनी ते पाहिल्यानंतर आरडाओरड सुरू झाली. (Police) पोलिस, आपत्ती व्यवस्थापन व नियंत्रण पथक, अग्निशमन दलाकडे त्या तरूणाला वाचविण्यासाठी साकडे घेतले गेले. मात्र, देवपूर की पश्‍चिम देवपूर पोलिस ठाण्याची हद्द यासह विविध कारणांमुळे बचाव पथके विलंबाने घटनास्थळी (Dhule News) दाखल झाली. तोवर तो तरुण प्रवाहात बेपत्ता झाला. (Dhule News Young Man Suicide)

पांझरा नदीत (Panjhara River) रात्री नऊपर्यंत सुरू असलेल्या शोध मोहिमेनंतरही तो तरुण हाती लागू शकला नाही. रोहित प्रदीप बोरसे (वय २८) असे त्याचे नाव आहे. जयहिंद मंगल कार्यालय परिसरातील गरुड कॉलनीत विजय पाटील (प्लॉट क्रमांक ३०) यांचे वास्तव्य आहे. त्यांच्याकडे रोहित बोरसे वास्तव्याला होता. तो शिक्षण घेत होता. काही वादातून त्याने पांझरा नदीत उडी (Suicide) घेतली. देवपूर व पश्‍चिम देवपूर पोलिसांच्या हद्दीच्या वादात बराच वेळ शोध मोहीम अडकली.

नैराश्‍येत होता रोहित

रोहितने आत्महत्येपूर्वी मित्रांना घटनेची माहिती दिली. याबाबत त्याची मित्रांनी समजूत काढली. तरीही त्याने नदीत उडी घेतली. घटनेनंतर घटनास्थळी मोठी गर्दी झाली. पट्टीच्या पोहणाऱ्या तरुणांनी घटना दिसताच रोहितचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. परंतु, पांझरा नदी प्रवाही असल्याने त्यांना शोध कार्यात यश मिळू शकले नाही. पोलिस दाखल झाल्यानंतर आपत्कालीन व्यवस्थापन व नियंत्रण पथकाच्या जवानांनी पांझरा नदीत उडी घेत तरुणाचा शोध सुरू केला. मात्र, बुधवारी रात्री नऊपर्यंत शोध कार्याला यश मिळू शकले नाही. काही दिवसांपासून रोहित नैराश्‍याच्या गर्गेत होता असे त्याचे काही मित्र सांगतात. त्याने सकाळी पांझरा नदीचा मोरी पूल गाठल्यानंतर मित्र धावपळ करत घटनास्थळी आले. तोपर्यंत रोहितने पांझरा नदीत उडी घेतली होती. रोहित हाती लागल्याशिवाय आनुषंगिक माहिती देऊ शकत नाही, असे पोलिसांनी प्रसारमाध्यमांना सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Running Benefits: सकाळी धावण्याचे शरीरावर काय परिणाम होतो?

Psychological Fact : नजर लागण्यामागे दडलं आहे एक सायकॉलॉजिकल सत्य, आत्ताच जाणून घ्या

Maharashtra Live News Update: यवतमाळ जिल्ह्यातील तीनशे घरात शिरलं पाणी

Jio Recharge Plan: फक्त ८९५ रुपयांत मिळणार ३३६ दिवसांची सेवा, जिओने दिला ग्राहकांसाठी मोठा लाभ

Vidarbha News : शेतातून येताना पावसात अक्रीत घडलं, ३ महिलांच्या अंगावर वीज कोसळली, बुलढाण्यात हळहळ

SCROLL FOR NEXT