Dhule News Saam tv
महाराष्ट्र

Dhule News: समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांचे कामबंद; विविध प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन

समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांचे कामबंद; विविध प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन

भूषण अहिरे

धुळे : राज्यातील समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य समुदाय आरोग्य अधिकारी संघटनेने कामबंद आंदोलनाची हाक दिली आहे. त्या अनुषंगाने धुळे (Dhule) जिल्ह्यातील समुदाय आरोग्य अधिकारी संघटनेने कामावर बहिष्कार टाकून कामबंद आंदोलन पुकारले आहे. (Maharashtra News)

कोरोना महामारीच्या काळात कोविड सेंटर येथे विनावेतन कर्तव्य बजावणारे तसेच कोविड लसीकरण पूर्ण करण्यास महत्वाचा वाटा बजावला होता. असे राज्यातील दहा हजाराच्या घरात असलेल्या आरोग्यवर्धिनी उपकेंद्र येथील समुदाय आरोग्य अधिकारी यांनी आपल्या अनेक मागण्या शासनदरबारी लाऊन धरल्या होत्या. परंतु शासनाकडून सकारात्मक पाऊले उचलली जात नसल्याने महाराष्ट्र राज्य समुदाय आरोग्य अधिकारी संघटनेने एकदिवसीय कामबंद आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.

२३ जानेवारीपासून बेमुदत कामबंद

सदरच्‍या मागण्या येत्या 23 जानेवारीपर्यंत पूर्ण न झाल्यास मुंबई येथील आझाद मैदान येथे मोठे बेमुदत राज्यव्यापी कामबंद आंदोलन उभारण्याचा इशाराही यावेळी आंदोलनकर्त्यांतर्फे देण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कळमनुरीत भाजपचा आमदार वाढेल; प्रज्ञा सातव यांच्या पक्ष प्रवेशानंतर मुटकुळेंचा दावा, शिंदे सेनेचं टेन्शन वाढलं

Saturday Horoscope: संधीचं सोनं कराल, ५ राशींना नशीब देणार साथ, वाचा शनिवारचे राशीभविष्य

Maharashtra Live News Update: लाडक्या बहिणींना योग्यवेळी 2100 रुपये देणार-एकनाथ शिंदे

शिंदेंच्या भावाचं नाव ड्रग्ज प्रकरणात? बड्या नेत्याचा गंभीर आरोप, नेमकं काय म्हणाले? VIDEO

Ananya Panday: अनन्या पांडेचा रस्ट कलर साडी लूक पाहिलात का?

SCROLL FOR NEXT