धुळे : राज्य परिवहन महामंडळातील कर्मचारींचा सुरू असलेला संप अजून देखील मिटलेला नाही. यात धुळे आगारातील चालक पदावर कार्यरत असलेल्या रविंद्र रघुनाथ पवार या एसटी कर्मचाऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या (Suicide) करण्याचा प्रयत्न केला. चालकाची प्रकृती चिंताजनक आहे. (dhule news st strike Poisoning by ST driver dhule Depot)
राज्य परिवहन महामंडळातील (MSRTC) कर्मचारी गेल्या साडेतीन महिन्यांहून अधिक दिवसांपासून संपावर आहेत. महामंडळाचे विलणीकरणाच्या मागणीसाठी (St Strike) संप पुकारला आहे. परंतु, राज्य शासनाला ही मागणी मान्य नसल्याने अद्याप संपावर तोडगा निघालेला नाही. उलट संप अधिक चिघळत असल्याचे पहावयास मिळत आहे.
रुग्णालयात दाखल परंतु..
बस चालकास कुटुंबियांनी तात्काळ (Dhule News) शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केले. परंतु, विष प्राशन केलेल्या आंदोलक एसटी कर्मचाऱ्याची प्रकृती चिंताजनक आहे. गेल्या चार महिन्यांपासून एसटी प्रशासनातर्फे वेतन बंद केलेले असल्यामुळे घरखर्च भागवता येत नसल्याच्या विवंचनेतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचे नातेवाईकांकडून सांगितले. तसेच एसटी प्रशासनातर्फे दखल घेण्याची कुटुंबीयांची मागणी केली आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.