Dhule corpoation 
महाराष्ट्र

रस्त्यावरील खड्डया विरोधात शिवसेना आक्रमक; धुळे मनपासमोर ठिय्या

रस्त्यावरील खड्डया विरोधात शिवसेना आक्रमक; धुळे मनपासमोर ठिय्या

भूषण अहिरे

धुळे : शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्डया विरोधात शिवसेनेचे पालिका प्रवेशद्वारावरच ठिय्या आंदोलन केले. यावेळी पालिका प्रशासनाचा निषेध करण्यात आला. (dhule-news-Shiv-Sena-aggressive-against-potholes-and-corporation-in-front-of-Dhule)

शहरातील रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. य्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सातत्याने शिवसेनेच्या वतीने पालिका प्रशासनाला जागे करण्यासाठी आंदोलन करण्यात येत आहे. परंतु याकडे पालिका प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्यामुळे आज अखेर प्रभाग क्रमांक पाच येथील नगरसेविका त्याचबरोबर शिवसेनेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते एकत्र येत धुळे महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन केले आहे.

पालिकेसमोर घोषणाबाजी

धुळे शहरातील देवपूर परिसरातील कॉलनी रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून नागरिकांना या रस्त्यांमधून प्रवास करताना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. या मार्गावरून दुचाकी धारकांना बऱ्याच वेळा अपघाताला देखील सामोरे जावे लागले असल्यामुळे आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी अखेर पालिका प्रवेशद्वारावर आंदोलन करत पालिका प्रशासनाचा निषेध केला आहे. या वेळी आंदोलकांनी पालिका प्रशासनाच्या विरोधामध्ये तीव्र घोषणाबाजी करीत संताप व्यक्त केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

RBI Rules: रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय! ऑनलाइन पेमेंटच्या नियमात केले बदल; तुमच्यावर काय होणार परिणाम? वाचा

Maharashtra Live News Update : साताऱ्यात जे घडलं ती गुंडगिरी, झुंडगिरी - संजय राऊत

Ginger- Jaggery Tea Recipe: आलं टाकून गुळाचा स्पेशल चहा कसा बनवायचा?

Shocking : भाजप नेत्याच्या मुलाचे सेक्स स्कँडल उघड; २५ हून अधिक मुलींचे शोषण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या

WhatsApp Update: खुशखबर! WhatsApp चॅटींगसाठी फोन नंबरची गरज नाही? वाचा नव्या फीचरची संपूर्ण माहिती

SCROLL FOR NEXT