Bribe Saam tv
महाराष्ट्र

सातबाऱ्यावर नावासाठी घेतले आठशे रुपये; तलाठ्याला लाच स्‍वीकारताना रंगेहाथ पकडले

सातबाऱ्यावर नावासाठी घेतले आठशे रुपये; तलाठ्याला लाच स्‍वीकारताना रंगेहाथ पकडले

साम टिव्ही ब्युरो

शिरपूर (धुळे): सातबाऱ्यावर नाव बदलून देण्यासाठी आठशे रुपयांची लाच स्वीकारताना होळनांथे (ता. शिरपूर) येथील तलाठी ज्ञानेश्वर जगन्नाथ बोरसे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) पथकाने मंगळवारी (ता. २३) सकाळी मुद्देमालासह अटक केली. (Dhule Shirpur Bribe News)

होळनांथे मंडळांतर्गत गावातील सातबाऱ्यावर नाव बदलून देण्यासाठी संबंधित तक्रारदार बोरसे याच्याकडे गेला होता. या कामासाठी आठशे रुपये लागतील, तेही लगेचच आणून द्यावे लागतील, असे बोरसे याने सांगितले. त्यामुळे तक्रारदाराने (Dhule) धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात संपर्क साधून माहिती दिली. विभागाच्या अधिकाऱ्यांनी तक्रारीची खात्री करून मंगळवारी होळनांथे येथील तलाठी कार्यालयाच्या परिसरात सापळा रचला. तक्रारदाराकडून आठशे रुपये स्वीकारताच (Bribe) पथकाने बोरसेवर झडप घातली. त्याला थाळनेर पोलिस ठाण्यात नेऊन गुन्हा दाखल करण्यात आला. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे डीवायएसपी अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक प्रकाश झोडगे, मंजितसिंह चव्हाण, हवालदार राजन कदम, कैलास जोहरे, शरद काटके, भूषण खलाणेकर, भूषण शेटे, संदीप कदम, संतोष पावरा, प्रशांत बागूल, रामदास बारेला, प्रवीण पाटील, महिला पोलिस गायत्री पाटील, वनश्री बोरसे, रोहिणी पवार, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर यांनी ही कारवाई केली. संशयित ज्ञानेश्वर बोरसेच्या शहरातील वासुदेव बाबानगर येथील घरीही झडती घेण्यात आली.

घोरपड येणार अशी होती चर्चा

मंगळवारी सकाळपासूनच शहरातील शासकीय कार्यालयाच्या परिसरात आज घोरपड येणार आहे, अशी चर्चा सुरू होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाला घोरपड या सांकेतिक नावाने ओळखले जाते. कारवाईचा सुगावा लागल्याने बहुतांश विभागांचे बडे अधिकारी आणि त्यांचे विशेष सेवक बेपत्ता झाले होते. कारवाई कुठे होणार याविषयी तर्कवितर्क व्यक्त केले जात होते. अखेर होळनांथे येथे कारवाई झाल्याची माहिती मिळाल्यानंतर सर्वांनी सुटकेचा श्वास सोडला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पश्चिम महाराष्ट्रात शिंदेंना भाजपचा धक्का, आमदाराच्या भावासह ४० पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेला जय महाराष्ट्र!

Body changes after death: मृत्यूनंतर व्यक्तीचं तोंड अनेकदा का उघडं राहतं?

Arjun Tendulkar : सचिनच्या पावलावर चालत अर्जुनने केला साखरपुडा; वयाचं गुपित ऐकून चाहत्यांमध्ये रंगली चर्चा

Maharashtra Live News Update: रायगडच्या पायथ्याशी जोरदार पाऊस

Dharashiv : व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची फसवणूक; खरेदी केलेल्या सोयाबीनचे पैसे न देता व्यापारी पसार

SCROLL FOR NEXT