धुळे : घरात झोपलेले असतांना पहाटेच्या सुमारास अचानक काहीतरी वस्तू खाली पडल्याचा आवाज आला. ते बघण्यासाठी गेले असतांना समोर चक्क आठ फुटी लांबीचा अजगर दिसला. यावेळी काही वेळ घबराटीचे वातावरण झाले. मात्र वनविभाग व सर्पमित्राने अखेर त्या अजगराला सुरक्षितपणे पकडले व त्यास आपल्या नैसर्गिक अधिवासात सोडले आहे. (dhule news saw an eight foot dragon in the house)
शिरपूर (Shirpur) तालुक्यातील असली गवातील मनोज ईशी हे आपल्या घरात मागच्या खोलीत झोपलेले होते. पहाटेच्या सुमारास घरात काही तरी वस्तू खाली पडल्याचा आवाज आला. मनोज ईशी हे आवाज आलेल्या दिशेने गेले असता त्यांना समोरच भला मोठा (Dhule News) अजगर दिसून आला. अजगर बघताच घबराटीचे वातावरण निर्माण झाले. मनोज ईशी यांनी त्यांचा पुतण्या राहुल याला आवाज देऊन घटनेची माहिती दिली.
सर्पमित्रांना दिली माहिती
राहुलने तात्काळ पळासनेर येथील सर्पमित्रास घरात भला मोठा अजगर असल्याचे सांगितले व वनविभागाला देखील याबाबत माहिती दिली. सर्पमित्राने मोठ्या शिताफीने या भल्यामोठ्या अजगराला पकडले व वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडे स्वाधिन केले आहे. वन विभागातर्फे अजगराला ताब्यात घेऊन त्याच त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.