Dhule Vidhan Sabha Saam tv
महाराष्ट्र

Dhule Vidhan Sabha : धुळ्यात मविआत वादाची ठिणगी; समाजवादीतर्फे उमेदवार जाहीर करताच राजकारण तापलं

Dhule News : धुळे शहर विधानसभा उमेदवारीवरून महाविकास आघाडीचे घटक पक्ष असलेल्या समाजवादी पार्टी व ठाकरे गट शिवसेनेमध्ये चांगलीच जुंपली आहे

भूषण अहिरे

धुळे : धुळे शहर विधानसभा उमेदवारीवरून महाविकास आघाडीचे घटक पक्ष असलेल्या समाजवादी पार्टी व ठाकरे गट शिवसेनेमध्ये चांगलीच जुंपली आहे. समाजवादी पार्टीच्या वतीने अखिलेश यादव यांनी ईर्षात जहागीरदार यांना उमेदवार घोषित करताच शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने देखील निवडून येणारा चेहरा मशालीचा असेल असे जाहीर केले. दुसरीकडे राष्ट्रवादी शरद पवार गटातर्फे देखील राष्ट्रवादीचा पारंपारिक मतदारसंघ असल्याचे म्हणत या जागेवर दावा केला आहे. त्यामुळे आता धुळे शहर विधानसभा उमेदवारीवरून महाविकास आघाडीत वादाची थिणगी पडली आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

धुळ्यामध्ये (Dhule) समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी १९ ऑक्टोम्बरला समाजवादी पार्टीतर्फे इर्शाद जहागीरदार यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर महाविकास आघाडीतील इतर घटक पक्षांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. कारण महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये जागावाटप संदर्भात चर्चा पार पडत असून अद्याप कुठल्याही जागेवर शिक्कामोर्तब झालेला नाही. त्यापूर्वीच (Samajwadi Party) समाजवादी पार्टीच्या वतीने अखिलेश यादव यांनी धुळे शहर विधानसभा मतदारसंघात उमेदवार जाहीर केली. यामुळे शिवसेना ठाकरे गट त्याचबरोबर राष्ट्रवादी शरद पवार गट यासह महाविकास आघाडीतील इतर घटक पक्षांमध्ये अस्वस्थता पसरल्याचे दिसून येत आहे. 

शिवसेनेची नाराजी 

समाजवादी पार्टी हा देखील महाविकास आघाडीचा म्हणजेच इंडिया अलायन्सचा महत्त्वाचा घटक पक्ष आहे. अशा परिस्थितीमध्ये मविआच्या प्रमुख नेत्यांना विश्वासात न घेता अखिलेश यादव यांनी धुळे दौऱ्यादरम्यान धुळे विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी घोषित केली आहे, तर दुसरीकडे धुळे शहर विधानसभा निवडणूक लढविणारा आणि विजयी होणारा चेहरा हा मशालीचाच असेल, अशी भूमिका देखील शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने व्यक्त करण्यात येत आहे. शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष अतुल सोनवणे यांनी याबाबत आपली भूमिका स्पष्ट करत नाराजी व्यक्त केली आहे. 

शरद पवार गट जागेवर ठाम 
तर दुसरीकडे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शहराध्यक्ष रणजीत भोसले यांनी देखील हा राष्ट्रवादीचा पारंपारिक मतदारसंघ असल्याचे म्हणत या जागेसाठी आपली प्रबळ दावेदारी असल्याचे मत व्यक्त केले. राष्ट्रवादी शरद पवार गटाचा उमेदवारच या ठिकाणी उमेदवारी करणारा असे मत व्यक्त केले आहे. त्यामुळे धुळ्यात झालेली अखिलेश यादव यांची सभा आणि त्यामध्ये अखिलेश यादव यांनी समाजवादी पार्टीच्या वतीने इर्षात जहागीरदार यांना जाहीर केलेली उमेदवारी, ही महाविकास आघाडीत वादाची ठिणगी ठरणार का? या संदर्भात आता राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधान आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pension: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! ८ दिवसांत हे काम करा, नाहीतर पेन्शन विसरा

Gautami Patil : गौतमी पाटील,अलका कुबल अन् सई ताम्हणकर स्क्रिनवर एकत्र झळकणार? 'तो' व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल

Bandra East Exit Poll: वांद्रे पूर्व मतदारसंघातून वरुण सरदेसाई आमदार होणार का? पाहा Exit Poll

Maharashtra Exit Poll : आपला भिडू बच्चू कडू... अचलपूरमधून बच्चू कडू पाचव्यांदा आमदार होणार? पाहा एक्झिट पोलचा अंदाज

Bhiwandi West Exit Poll: भिवंडी पश्चिम मतदारसंघामध्ये भाजप की काँग्रेस कोण मारणार बाजी? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT