Mohini Jadhav
Mohini Jadhav saam tv
महाराष्ट्र

Sakri: मोहिनी जाधव मृत्‍यू प्रकरण..पीडित कुटुंबाचा ध्‍वजारोहणापुर्वी आत्मदहनाचा प्रयत्न

साम टिव्ही ब्युरो

साक्री (धुळे) : येथील मोहिनी जाधव मृत्यू प्रकरणातील पीडित जगताप व जाधव कुटुंबीयांनी आज ध्वजारोहणायापूर्वी आत्मदहनाचा प्रयत्न केल्याने मोठी खळबळ उडाली. पोलिसांनी (Police) मात्र प्रसंगावधान राखत या सर्वांना बाजूला केल्याने पुढील अनर्थ टळला. (dhule news sakri Mohini Jadhav death case family Attempt to set himself on fire)

साक्री नगरपंचायत (Sakri Nagar Panchayat) निवडणुकीच्या निकालानंतर झालेल्या हाणामारी प्रकरणात मोहिनी जाधव यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणाने गेल्या आठवडाभरापासून वातावरण तापलेले आहे. अशात या प्रकरणातील संशयित आरोपींना अटक व्हावी व कुटुंबाला शासकीय, आर्थिक मदत मिळावी; या मागणीसाठी जगताप व जाधव कुटुंबीयांनी दोन दिवसांपूर्वीच प्रशासनाला निवेदन देत प्रजासत्ताक दिनी (Republic Day) आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. या अनुषंगाने प्रशासनाकडून देखील खबरदारी घेण्यात येत होती.

महामार्गावरच आत्‍मदहनाचा प्रयत्‍न

असे असताना देखील आज सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास शासकीय ध्वजारोहणाच्या काही वेळ आधीच गोटू जगताप यांच्यासह कुटुंबीयांनी अचानक तहसील कार्यालयाच्या समोर राष्ट्रीय महामार्गावर येऊन आत्मदहनाचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत सर्वांना बाजूला केल्याने पुढील अनर्थ टाळायला.

रास्‍ता रोको करत पालकमंत्र्यांसोबत चर्चेची मागणी

दरम्यान यावेळी जगताप कुटुंबीयांनी रस्ता रोको करत पालकमंत्र्यांना चर्चेसाठी बोलावण्याची मागणी केली होती. प्रशासनाने मात्र या सर्वांची समजूत घालत लवकरच संशयितांना ताब्यात घेण्याचे आश्वासन यावेळी दिले. यावर पुन्हा तीन दिवसांची मुदत पीडित कुटुंबाकडून प्रशासनास देण्यात आली असून, तीन दिवसात अटक आणि मदत न मिळाल्यास पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा त्यांच्याकडून देण्यात आला आहे. अप्पर तहसीलदार विनायक थविल यांनी पीडित कुटुंबियांशी चर्चा केली तर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप मैराळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक एच.एल.गायकवाड यांच्यासह पोलीस अधिकारी, कर्मचारी बंदोबस्त ठेवून होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

RCB Playoffs Scenario: 'इ साला कप नामदे..' RCB ला अजूनही प्लेऑफमध्ये जाण्याची संधी! करावं लागेल हे काम

Yogita Chavan: हुस्नपरी, बोल्डसुंदरी... अंतराच्या अदांचा जलवा!

Today's Marathi News Live : साखर कारखान्याचा १०००० कोटींचा आयकर माफ केला, देवेंद्र फडणवीस

Mumbra News : मुंब्रा परिसरात एनसीबीची मोठी कारवाई; आंतरराज्य अमली पदार्थ तस्करीला पर्दाफाश

Mumbai Jobs | मराठी माणसाविषयीची ती पोस्ट, कंपनीने मागितली माफी!

SCROLL FOR NEXT