Dhule News Saam tv
महाराष्ट्र

Dhule News: दगडी कोळशाने भरलेल्‍या धावत्‍या ट्रकला आग; सुदैवाने मोठा अनर्थ टळला

दगडी कोळशाने भरलेल्‍या धावत्‍या ट्रकला आग; सुदैवाने मोठा अनर्थ टळला

भूषण अहिरे

धुळे : मुंबई– आग्रा महामार्गावर धुळे शहरापासून काही अंतरावर असलेल्या आझादनगर पोलीस (Police) ठाण्याच्या हद्दीमध्ये बर्निंग ट्रकचा थरार बघावयास मिळाला आहे. (Tajya Batmya)

मुंबई आग्रा महामार्गावरून जाणाऱ्या दगडी कोळशाने भरलेल्या ट्रकला अचानक आग लागली. ट्रकमध्ये असलेल्या ट्रक चालकाने प्रसंगावधान दाखवत ट्रकला आग (Fire) लागल्याचे लक्षात येताच बाहेर उडी घेतली. यामुळे सुदैवाने या घटनेत कुठल्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही. परंतु काही (Dhule) वेळातच या ट्रकने मोठ्या प्रमाणात पेट घेतला व या आगीत ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

वाहतूक खोळंबली

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी तात्काळ पोहोचले. अथक प्रयत्नानंतर या आगीवर नियंत्रण मिळवले आहे. ट्रकला लागलेल्या आगीमुळे मुंबई आग्रा महामार्गावरील वाहतूक बराच वेळ खोळंबल्याचे बघावयास मिळाले आहे. ट्रकला आग लागल्याच्या घटनेची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bank Holiday: खातेधारकांनो लक्ष द्या! 13 ऑगस्टला बँका बंद की सुरू? जाणून घ्या तुमच्या राज्यातील अपडेट...

India Fort : १५ ऑगस्टला फिरण्याचा प्लान करताय? देशभक्तीची भावना जागवणाऱ्या 'या' ऐतिहासिक स्थळांना नक्की भेट द्या

Maharashtra News Live Update : आंबोली-चौकुळच्या सड्यावर कोल्ह्यांच्या कळपाचा मुक्त खेळ

Fitness Tips: जिमला जाण्याची गरज नाही! फिट आणि अॅक्टिव्ह राहण्यासाठी ‘या’ ७ सवयी लावा

Mumbai Police: ड्रग्ज खरेदी करताना पोलिसाला अटक, मुंबई पोलिस दलात खळबळ

SCROLL FOR NEXT