Dhule News Saam tv
महाराष्ट्र

Dhule News : आवडत्या शिक्षकाची बदली; विद्यार्थ्यांनी केले शाळा बंद आंदोलन

आवडत्या शिक्षकाची बदली; विद्यार्थ्यांनी केले शाळा बंद आंदोलन

भूषण अहिरे

धुळे : शाळेतील काही शिक्षक हे विद्यार्थी प्रिय असतात. अशा विद्यार्थी प्रिय शिक्षकाची बदली झाली तर (Dhule) विद्यार्थ्यांना अश्रू अनावर होत असल्याचे पहिले आहे. अशाच एका विद्यार्थी प्रिय शिक्षकाची (Teacher) बदली झाल्यानंतर बदली रद्द करण्यासाठी चक्क विद्यार्थ्यांनीच शाळेबाहेर आंदोलन केले आहे. (Maharashtra News)

साक्री तालुक्यातील शिरसोली जिल्हा परिषदेच्या शाळेतील (Zp School) हा सर्व प्रकार असून, कुंदन मायके असे बदली झालेल्या शिक्षकांचे नाव आहे. कुंदन मायके या आपल्या आवडत्या शिक्षकांची बदली रोखण्यासाठी चिमुकल्यांनी केलेल्या या आंदोलनाचे सध्या साक्री तालुक्यासह संपूर्ण जिल्हाभरामधुन कौतुक केले जात आहे. धुळे जिल्हा परिषद शिक्षण विभाग या चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची दखल घेणार का हे बघणं औचित्याच ठरणार आहे.

तोपर्यंत शाळेत येण्यास नकार  

जोपर्यंत शिक्षकांची बदली रद्द करीत नाहीत, तोपर्यंत शाळेमध्ये येणार नाही; अशी भूमिका या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी घेतली आहे. तसेच त्यांच्या पालकांनी देखील त्यांच्या मागणीला समर्थन देत विद्यार्थ्यांच्या या आंदोलनामध्ये आपला सहभाग नोंदवला आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या पालकांनी देखील जोपर्यंत शिक्षकांची बदली रद्द होत नाही तोपर्यंत पाल्यांना शाळेत पाठवणार नाही अशी भूमिका घेतली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: उत्तर महाराष्ट्रात आजपासून थंडीच्या लाटेचा इशारा

PM Kisan Yojana: आज ९ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात ₹२००० जमा होणार; तुम्हाला येणार की नाही? अशा पद्धतीने करा चेक

Nachni Bhakri Tips: नाचणीची भाकरी थापताना तुकडे पडतात? शेकल्यावर लगेचच कडक होते? "ही" घ्या भाकरीची परफेक्ट रेसिपी

Maharashtra Government: छोटे भूखंड नियमित करण्याचे निर्देश, ३ कोटी नागरिकांना फायदा होणार

Success Story: घर आणि नोकरी सांभाळत दिली UPSC; दोन लेकींची आई ४०व्या वर्षी झाली IAS; निसा उन्नीराजन यांचा प्रेरणादायी प्रवास

SCROLL FOR NEXT