Dhule News Saam tv
महाराष्ट्र

Dhule News : लाल मिरची, मसाल्यात केमिकल रंग भेसळ; पोलिसांच्या कारवाईत धुळ्यात रॅकेट उघडकीस

भूषण अहिरे

धुळे : रोजच्या स्वयंपाकात वापरण्यात येणाऱ्या लाल मसाल्यामध्ये हानिकारक रंग मिक्स करून बाजारात विक्री केली जात होती. सर्रासपणे हे काम केले जात असल्याबाबत पोलिसांना याची माहिती मिळाली. यानंतर पोलिसांनी कारवाई केली. यात मोठे रॅकेट असल्याचे समोर आले आहे.  

स्वयंपाकात वापरण्यात येणाऱ्या मसाल्यांमध्ये अत्यंत हानिकारक आणि टॉक्सिक रंग व केमिकल्स वापरले जातात; अशी माहिती (Dhule LCB) धुळ्याच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला प्राप्त झाली होती. यानंतर पथकाने एमआयडीसी मधील मसाले निर्मितीच्या कंपनीत झोपेमारी केली आहे. यात पथकाने केलेल्या तपासात हा भेसळीचा प्रकार करण्यात मोठे रॅकेट असल्याचे समोर आले आहे. 

नमुने तपासणीसाठी 

धुळे (Dhule) एमआयडीसी मोहाडी येथे लाल मसाल्यामध्ये हानिकारक रंग आणि केमिकल्सच्या भेसळीचे मोठे रॅकेट उघडकीस आणले आहे. यासंदर्भात दोघा संशयितांची चौकशी फूड अँड ड्रग्स विभागाच्यावतीने करण्यात येत आहे. तसेच पुढील सर्व तपास करण्यात येत असून यासंदर्भात फूड अँड ड्रग्स विभागाचा पथकाने येथील नमुने देखील तपासणीसाठी घेतले आहेत. फूड अँड ड्रग्स विभागाच्या तपासणीचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Live Updates: नवी मुंबई परतीच्या पावसाचा धुमाकूळ,

Mumbai Rain: मुंबईत 'रेड अलर्ट', पावसामुळे नागरिकांची दाणादाण; लोकल सेवा विस्कळीत, ट्रेनची सद्यस्थिती काय? जाणून घ्या

Laxman Hake : जरांगे पाटील नावाचं लूत भरलेलं घोडं आम्ही वेशीत अडवलं; लक्ष्मण हाके यांची टीका

Heavy Rain in Mumbai : मुंबईत तुफान पाऊस! मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित; पुढील काही तास धोक्याचे, VIDEO

Pune Tourist Place : डोळ्यांचं पारणं फेडणारा अद्भुत असा कोकण दिवा किल्ला!

SCROLL FOR NEXT