Dhule News Rain Saam tv
महाराष्ट्र

Dhule News: धुळे शहरासह परिसरात पावसाची हजेरी; बळीराजा सुखावला

धुळे शहरासह परिसरात पावसाची हजेरी; बळीराजा सुखावला

भूषण अहिरे

धुळे : दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले असताना महिनाभराच्‍या प्रतिक्षेनंतर (Dhule) धुळे शहरासह परिसरात आज पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे शेतकरी (Farmer) सुखावला आहे. असे असले तरी दमदार पावसाची अजूनही प्रतिक्षा कायम आहे. (Maharashtra News)

धुळे शहरासह जिल्ह्यात विविध ठिकाणी यंदाच्या हंगामातील पावसाने हजेरी लावली आहे. जून महिना संपत आला तरी देखील अद्यापही पावसाने हजेरी लावली नव्हती. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्या होत्या. परंतु आज झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. यामुळे काही ठिकाणी शेतकरी पेरणीच्‍या तयारीला लागला आहे.

उकाड्यापासून दिलासा

पाऊस (Rain) येत नसल्‍याने नागरीक उकाड्याने हैरान झाले होते. मात्र दोन दिवस ढगाळ वातावरण होते. यात आज झालेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाल्याने उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ठाकरे रात्री १२ वाजता कुठे जायचे? सकाळी ६ वाजता परतायचे; बड्या नेत्याचा खळबळजनक आरोप

Maharashtra News Live Update: पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी मिरवणूक मार्गाची पाहणी करत पोलीस प्रशासन आणि मंडळांच्या नियोजनाचे केले कौतुक

राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात; दोन मिनी-बस समोरासमोर धडकल्या; वाहनांचा चक्काचूर, 21 जणांचा जागीच मृत्यू

नाशिकमध्ये मध्यरात्री तोडली शेकडो झाडे, पाहा व्हिडिओ

महाराष्ट्रात कधी लागू होणार समान नागरी कायदा? CM फडणवीस म्हणाले यंदाच्या हिवाळी अधिवेशनात...

SCROLL FOR NEXT