Dhule News Saam tv
महाराष्ट्र

Dhule News: ४२ जागांसाठी पोलीस भरती प्रक्रियेला सुरुवात; ३७९६ अर्ज दाखल

४२ जागांसाठी पोलीस भरती प्रक्रियेला सुरुवात; ३७९६ अर्ज दाखल

भूषण अहिरे

धुळे : जिल्हा पोलिस दलातील ४२ रिक्त जागा भरण्यासाठी धुळे (Dhule) शहरातील पोलिस कवायत मैदानावर भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. पोलिस (Police) प्रशासनाकडे ३ हजार ७९६ अर्ज आले आहेत. भरतीसाठी सुमारे ४०० पोलिसांची नियुक्ती करण्यात आली आहे. (Live Marathi News)

भरतीला येणाऱ्या उमेदवारांसाठी पोलीस (Dhule Police) प्रशासनातर्फे सर्व तयारी करण्यात आली असून उमेदवारांना आवश्यक सर्व बाबींची सोय देखील करण्यात आली आहे. उमेदवारांना पोलिस कवायत मैदानाच्या मुख्य प्रवेशद्वारातून आत सोडले जात असतांना आवश्यक कागदपत्रे तपासली जात आहेत. त्यामुळे मुख्यालयासमोरील मॉडर्न रोडवर वाहतूक कोंडी होऊ शकते. यामुळे वाहतुकीचे नियोजन देखील करण्यात आले आहे.

पहिल्‍या दिवशी ८०० उमेदवारांना संधी

पोलिस भरतीसाठी पहाटे साडेपाच वाजेपासून पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आले आहे. सकाळी साडेसहा वाजेनंतर उमेदवाराच्या कागदपत्रांची तपासणी केल्यावर त्यांना आत सोडण्यात आले. पहिल्या दिवशी ८०० उमेदवारांना संधी दिली जाणार आहे. भरती प्रक्रियेसाठी मैदानात सुमारे २८६ अधिकारी व कर्मचारी तैनात करण्यात आले आहे. तसेच मैदानाबाहेरही मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात आहे.

सीसीटीव्‍ही कॅमेराचीही नजर

भरती प्रक्रिया पारदर्शी पद्धतीने व्हावी; यासाठी सुमारे २० सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. छाती व उंची मोजणीसाठी ८ ठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे. मैदानात कागदपत्रांसह विविध प्रकारच्या तपासण्या करण्यासाठी १५ तंबू उभारण्यात आले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: वंचित बहुजन आघाडीच्या आक्रोश मोर्चाची परवानगी पोलिसांनी नाकारली

आम्ही किंगमेकर आहोत...'; टायगर ग्रुपच्या कार्यकर्त्यांची कारच्या टपावर बसून हुल्लडबाजी; पोलीस काय कारवाई करणार?

Maharashtra Politics: काँग्रेसच्या भूमिकेनंतर उद्धव ठाकरे बंधू राज ठाकरेंच्या भेटीला; राजकीय हालचालींना वेग

Karjat Tourism : डोंगर, दऱ्या अन् धबधबे; कर्जतजवळ प्लान करा दिवाळी वीकेंड, 'हे' आहे खास लोकेशन

Gold price : अवघ्या ६ मिनिटात सोनं ७,७०० रुपयांनी स्वस्त; सोन्याच्या दरात वर्षभरातील सर्वात मोठी घसरण

SCROLL FOR NEXT