Dhule Saam tv
महाराष्ट्र

पांझरा नदी होणार कचरामुक्‍त; प्लास्टिक कचरा मुक्ती अभियान

भूषण अहिरे

धुळे : प्लास्टिक कचराच्या विळख्यात अडकलेल्या पांझरा नदीतून प्लास्टिक कचरा मुक्ती अभियान अंतर्गत सामाजिक संघटनांतर्फे स्वच्छता अभियान करण्यात आले. प्लास्टीक कचरा मुक्ती अभियानांतर्गत धुळे (Dhule) शहरात पांझरा नदी पात्रात स्वच्छता अभियान राबवण्यात आले आहे. (dhule news Panjra river will be garbage free Plastic waste disposal campaign)

शहराच्या मधोमध असलेल्या पांझरा नदी (Panjhara River) पात्रात प्लास्टिकचा कचरा मोठ्या प्रमाणात जमा झाला आहे. या प्लास्टिक कचऱ्याच्या विळख्यात अडकली असून नदीकडे येथील स्थानिक लोकप्रतिनिधींनी लक्ष न दिल्याने नदीच्या प्रदूषणामध्ये वाढ झाली असल्याचा आरोप स्थानिकांनी लावला आहे.

संपुर्ण नदी करणार स्‍वच्‍छ

नदीमधील या प्लास्टिकच्या कचऱ्यामध्ये दिवसेंदिवस अधिकच वाढ होत असल्यामुळे सामाजिक संघटनांतर्फे आज प्लास्टिक मुक्ती अभियानांतर्गत नदीमध्ये साचलेला प्लास्टिकचा कचरा काढून नदी स्वच्छ करण्याचे अभियान राबविण्यात आले आहे. यावेळी मोठ्या संख्येने सामाजिक कार्यकर्ते व संघटनेचे पदाधिकारी या अभियानामध्ये सामील झाल्याचे बघायला मिळाले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rohit sharma: होय..माझा 'तो' निर्णय चुकला! रोहित शर्माने का मागितली माफी?

Bus Accident : घाट रस्त्यात बसचा अपघात; विद्यार्थ्यांसह ४० प्रवाशी जखमी

Maharashtra Politics: पुणे, सोलापूर ते लातूर, संगमनेर; काँग्रेसची उमेदवारी यादी रवींद्र धंगेकरांनी टाकली अन् डिलीट केली

Maharashtra News Live Updates: पपई पिकावर मोझॅक रोगाच्या प्रादुर्भाव, शेतकरी हवालदिल

Poha Chivda: दिवाळीसाठी घरी खमंग अन् कुरकुरीत बनवा पोह्यांचा चिवडा

SCROLL FOR NEXT