महाराष्ट्र

जिल्‍हा रुग्णांलयात रुग्णांना दाखल करेना; समाजवादी पार्टीचे निदर्शने

जिल्‍हा रुग्णांलयात रुग्णांना दाखल करेना; समाजवादी पार्टीचे निदर्शने

भूषण अहिरे

धुळे : साथीच्या आजारांच्या रुग्णांना उपचारासाठी शासकीय जिल्हा रुग्णालयात दाखल करून घेतले जात नाही. यामुळे समाजवादी पार्टीतर्फे आज निदर्शने आंदोलन करण्यात आले. (dhule-news-Not-admitting-patients-to-the-civil-hospital-Samajwadi-Party-protests)

गेल्या काही दिवसांपासून धुळ्यामध्ये डेंग्यू मलेरिया त्याचबरोबर इतर साथीच्या आजारांनी डोके वर काढले आहे. यामुळे रुग्णालयामध्ये रुग्णांची संख्यादेखील अधिक आहे. अशा परिस्थितीमध्ये धुळे जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये रुग्णांना उपचारासाठी दाखल करून घेतले जात नसून अशा रुग्णांना शासकीय हिरे वैद्यकीय महाविद्यालयामध्ये उपचारासाठी दाखल होण्याचा सल्ला दिला जात आहे. यामुळे रुग्णांचे व रुग्णांच्या नातेवाइकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. या विरोधामध्ये समाजवादी पार्टीच्या वतीने धुळे जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या बाहेर प्रशासनाच्या विरोधामध्ये घोषणाबाजी करीत निदर्शने करण्यात आली आहेत.

निवेदन देवून इशारा

संबंधित अधिकाऱ्यांना याबाबतचे निवेदन देण्यात आले असून निवेदनातून संबंधित आरोग्य अधिकाऱ्यांना समाजवादी पार्टीतर्फे गंभीर इशारा देत पुढील काळात रुग्णांची अशा पद्धतीने हेळसांड करण्यात आली तर रुग्णालयास टाळे ठोका आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बिहारमध्ये मोठी दुर्घटना! गंगा नदीत २० जणांना घेऊन जाणारी बोट उलटली; ११ जणांचा मृत्यू

महायुतीत समन्वयाचा 'दुष्काळ', उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा नाराज?

Fact Check: ऑनलाईन शॉपिंग महागणार? ऑनलाईन शॉपिंगवर 5% GST?

नवी मुंबई महापालिकेत मतदार राहतात, वॉर्ड ऑफिसच्या पत्त्यावर 27 मतदारांची नोंद

IMD Alert: महाराष्ट्रासह 17 राज्यात धो-धो बरसणार वरूणराजा; 60 ताशी वेगाने वाहणार सोसाट्याचा वारा

SCROLL FOR NEXT