Dhule Corporation Saam tv
महाराष्ट्र

Dhule Corporation : महापालिकेकडून कर वसुलीचा तगादा; सुविधा नसल्याने नागरिक संतप्त

Dhule News : धुळे महापालिका प्रशासनाकडून देखील वसुली राबविली जात असून थकबाकीदारांकडे जाऊन दारासमोर डफ वाजवत वसुली केली जात आहे. मात्र धुळेकरांकडून महापालिकेकडून दिल्या जाणाऱ्या सुविधांबाबत नाराजी

भूषण अहिरे

धुळे : मार्च एंडिंगच्या पार्श्वभूमीवर थकीत कर वसुली मोहीम राबविली जात आहे. धुळे महानगरपालिका प्रशासनातर्फे सध्या कर वसुलीसाठी नागरिकांना मोठ्या प्रमाणात तगादा लावण्यात येत आहे. परंतु कर वसुली केली जात असताना नागरिकांना पालिका प्रशासनातर्फे दिल्या जाणाऱ्या सुविधांचा विसर पडल्याचे दिसून येत आहे. यामुळे नागरिकांमध्ये रोष व संतप्त भावना व्यक्त केल्या जात आहेत. 

आर्थिक वर्ष समाप्तीवर असल्याने पालिका व महापालिका प्रशासनाकडून कर वसुली जोरदार करण्यात येत आहे. त्यानुसार धुळे महापालिका प्रशासनाकडून देखील वसुली राबविली जात असून थकबाकीदारांकडे जाऊन त्यांचा दारासमोर डफ वाजवत वसुली केली जात आहे. मात्र धुळेकरांकडून महापालिकेकडून दिल्या जाणाऱ्या सुविधांबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे. या संदर्भात कर वसुलीच्या नादात पालिका प्रशासनाला दिल्या जाणाऱ्या सुविधांचा विसर पडला आहे का? असाच काहीसा प्रश्न उपस्थित राहिला आहे. 

पाणी, कचरा संकलनाची समस्या 

धुळे शहरामध्ये गेल्या आठ- आठ दिवस कचरा संकलन करणाऱ्या घंट्यागाड्याच येत नसल्याने शहरात ठिकठिकाणी चौकाचौकांमध्ये मोठ्या प्रमाणात कचरा संकलित झाला असून घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. तर दुसरीकडे नागरिकांना पुरविले जात असलेले पिण्याचे पाणी देखील दुर्गंधीयुक्त येत असल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. घाणीचे साम्राज्य आणि दुर्गंधीयुक्त पिण्याचा पाण्याचा पुरवठ्यामुळे नागरिकांना एकीकडे पालिका प्रशासनाला कर देऊन देखील आरोग्य खराब करून घेण्याची वेळ आली आहे. 

एकीकडे कर वसुलीसाठी थकबाकीदार नागरिकांच्या घरासमोर पालिका प्रशासनाची कर वसुली पथक अक्षरशः ढोल वाजवून थकबाकीदारांच्या इब्रतीचे वाभाडे काढत आहे. परंतु या कर वसुलीच्या बदल्यात पालिका प्रशासनातर्फे दिल्या जाणाऱ्या सुविधांचे काय? असा प्रश्न संतप्त धुळेकर नागरिकांतर्फे पालिका प्रशासनाला विचारण्यात येत आहे. तुम्ही कर वसुली जरूर करा परंतु नागरिकांच्या जीवाशी खेळणं बंद करा असाच काहीसा प्रश्न नागरिक पालिका प्रशासनाला विचारत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Aadhaar Card Update : आधार कार्डधारकांसाठी मोठी बातमी! UIDAIने बदलली Face Authenticationची पद्धत, असा होणार फायदा

Gold Rate : गणेशोत्सवात सोनं खरेदीदारांना दिलासा! १० तोळे ९२०० रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या 22k, 24k, 18k चे आजचे ताजे दर

Chocolate Modak vs Mawa Modak: चॉकलेट मोदक की मावा मोदक? यंदाच्या गणेशोत्सवात लहान मुलांसाठी बनवा हे दोन्ही मोदक

LDL cholesterol: निरोगी व्यक्तीची कोलेस्ट्रॉल लेव्हल किती? ही रेंज माहित आहे का?

Dark elbows causes: कोपर काळं पडतंय? धूळ-मळ समजून दुर्लक्ष करू नका, शरीरातील ‘या’ गंभीर समस्येचा असू शकतो संकेत

SCROLL FOR NEXT