Dhule News Saam tv
महाराष्ट्र

Dhule: मोटरसायकल चोरी, घोरफोडी करणारे ताब्‍यात

मोटरसायकल चोरी, घोरफोडी करणारे ताब्‍यात

भूषण अहिरे

धुळे : चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चोऱ्या उघडकीस आणण्यासाठी पोलिसांनी (Police) कसून तपास केला. दोन घटनांमधील मोटर सायकल चोरी (Theft) आणि घरफोडी करणाऱ्या संशयतांना ताब्यात घेतले आहे. त्‍यांच्‍याकडून लाखोंचा मुद्देमाल जप्त केला आहे. (Dhule Crime News)

गेल्या काही दिवसांपूर्वी शहरातील अजमेरानगर परिसरातून मोटरसायकल चोरीची तक्रार चाळीसगाव (Chalisgaon) रोड पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. या चोरी संदर्भात पोलिसांनी एका आरोपीला ताब्यात घेत पाच मोटरसायकली जप्त (Dhule) केल्या आहेत. या चोरट्याला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याच्याकडून एक लाख 90 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

गॅरेजमध्‍ये चोरी

दुसऱ्या घटनेत गरीब नवाजनगर परिसरातून गॅरेजमध्ये चोरी झाल्याची घटना उघडकीस आली होती. यासंदर्भात पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याच्या तपास करीत असताना पोलिसांनी एका विधी संघर्शीत बालकाला हजारोंच्या मुद्देमालासह ताब्यात घेतले आहे. या विधीसंघर्षित बालकाने गॅरेजमधून चोरी केलेला मुद्देमाल आझादनगर परिसरात एका भंगारवाल्याला विक्री केला असल्याची कबुली दिली. घरफोडीच्या गुन्ह्यामध्ये विधीसंघर्षित बालक आणि भंगार विक्रेते या दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांचेकडून वीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती पोलीस अधीक्षक प्रवीण कुमार पाटील यांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जालन्यात पेट्रोल-डिझेल दरवाढीचा भडका

Weight Loss Drinks: वजन कमी करायचं आहे? मग या ७ ड्रिंक्सपैकी एक ड्रिंक पिऊन करा झटपट वजन कमी

Musician Death: भारतीय संगीताचा अनमोल ठेवा हरपला; ज्येष्ठ तबला वादक काळाच्या पडद्याआड, संगीतविश्व शोकसागरात

नीटची फेरपरीक्षा कधी होणार? NTA कडून अधिकृत तारीख जाहीर

Kidney cancer: लहान मुलांमध्ये किडनीच्या कॅन्सरची ही ३ प्रमुख लक्षणं दिसतात; 99% पालक करतात दुर्लक्ष

SCROLL FOR NEXT