Dhule News Saam tv
महाराष्ट्र

Dhule News : दुकानाबाहेर मराठी पाट्यांसाठी मनसे आक्रमक; दुकानाबाहेर केले आंदोलन

भूषण अहिरे

धुळे : दुकाना बाहेर मराठी पाट्या लावण्यासंदर्भात मनसेतर्फे गेल्या कित्येक वर्षांपासून आक्रमक भूमिका घेतली आहे. यानंतर न्यायालयाने दिलेल्या आदेशनानंतर मुंबईमध्ये मनसेकडून (MNS) मराठी भाषांचे बोर्ड लावण्यासाठी आवाहन केले जात आहे. त्यानुसार (Dhule) धुळ्यात आज मनसेच्यावतीने दुकानांबाहेर आंदोलन करण्यात आले. (Maharashtra News)

दुकाना बाहेर इतर भाषांमधील असलेले फलक हटवून मराठी भाषेत फलक लावण्यात यावे अशी मागणी करण्यात आलेली होती. या संदर्भात न्यायालयाने देखील मराठी फलक लावण्या संदर्भात आदेश देऊन देखील अनेक दुकानदारांनी फलक बदलविले नाही. ज्या दुकान मालकांनी अद्यापही आपल्या दुकानाच्या बाहेर इतर भाषांचे बोर्ड लावलेले आहेत; अशा दुकान मालकांना मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी आज पुन्हा एकदा बोर्ड मराठीतून लावण्या संदर्भात विनंती केली आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

धुळे शहरात विविध दुकानाबाहेर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी उभे राहून दुकान मालकांना मराठीतून बोर्ड लावण्या संदर्भात विनंती केली आहे. मनसेच्या या विनंतीला बहुतांश दुकान मालकांनी सकारात्मक भूमिका दर्शवत दुकानाच्या पाट्या देखील बदलण्यासंदर्भात सकारात्मकता दर्शवली असून, आगामी काही दिवसात या पाट्या बदलल्या गेल्या नाही; तर मनसे स्टाईल खेळखट्याक आंदोलन करून या दुकान मालकांना उत्तर दिले जाईल असे मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Solapur News: धर्मराज काडादी यांनी विधानसभा लढवण्याची केली घोषणा, सोलापूरमधून उमेदवारीसाठी शिंदेंना घातलं साकडं?

Ratnagiri Killing Case : स्वप्न पडलं, डेड बॉडीचं गूढ उलगडलं? रत्नागिरीतील हत्याकांडाचा सस्पेन्स उलगडणार? पाहा व्हिडिओ

Tirupati Laddoos: 'तिरुपती बालाजीच्या लाडूंमध्ये चरबीचा वापर'; सीएम चंद्राबाबू नायडूंचा रेड्डी यांच्या सरकारवर गंभीर आरोप

STREE 2 च्या कोरिओग्राफरला केली अटक, अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप

Ajit Pawar: वाचाळवीरांनी मर्यादा पाळाव्यात; अजित पवारांनी CM शिंदेंसमोरच आमदारांचे टोचले कान

SCROLL FOR NEXT