Dhule Police Saam tv
महाराष्ट्र

Dhule Police : धुळ्यात एमडी ड्रग्सचा साठा हस्तगत; धुळे पोलिसांकडून कारवाई, दोघे ताब्यात

Dhule News : धुळ्यात झालेल्या कारवाईने पुन्हा एकदा एमडी ड्रग्स विक्री होत असल्याचे उघडकीस आले आहे. आता याचा सखोल तपास सुरु असून यात मोठे रॅकेट समोर येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे

भूषण अहिरे

धुळे : ड्रग्स तसेच अंमली पदार्थांची विक्री व तस्करी करण्यास बंदी आहे. असे असताना देखील ड्रग्सची विक्री केली जात असल्याचे धुळ्यात झालेल्या कारवाईतून समोर आले आहे. धुळ्यात एमडी ड्रग्सचा साठा पोलिसांनी हस्तगत केला आहे. तर या कारवाईमध्ये दोमी जणांच्या पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून जवळपास १०७ ग्रॅम वजनाचा एमडी ड्रग्सचा साठा धुळे पोलिसांनी हस्तगत केला आहे. 

नशेसाठी वापरण्यात येत असलेल्या अंमली पदार्थांची वाहतूक व विक्रीला बंदी करण्यात आली आहे. असे असताना देखील छुप्या पद्धतीने ड्रग्सची विक्री केली जात असल्याचे उघडकीस आले आहे. धुळ्यात करण्यात आलेल्या कारवाईने पुन्हा एकदा एमडी ड्रग्स विक्री होत असल्याचे उघडकीस आले आहे. या कारवाया झाल्यानंतर याचे मुंबई कनेक्शन समोर येत असून कारवाईनंतर पुन्हा ड्रग्स तस्करी सुरु होते. 

पोलिसांची सापळा रचत कारवाई 
दरम्यान धुळे पोलिसांना गुप्त माहिती दाराच्या मार्फत मिळालेल्या माहितीनुसार धुळे शहरात एमडी ड्रग्सचा साठा येणार असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने सापळा रचला असता या सापळा दरम्यान एका वाहनामध्ये दोन संशयित ईसम पोलिसांना आढळून आले. पोलिसांनी तात्काळ हे वाहन ताब्यात घेऊन त्याची तपासणी केली.  

साठा जप्त करत दोघेजण ताब्यात 

सदरच्या वाहनामध्ये १०७ ग्रॅम इतका एमडी ड्रग्सचा साठा पोलिसांना आढळून आला आहे. या कारवाईत दोन जणांना ताब्यात घेत तपास सुरु आहे. तर यापूर्वी देखील धुळ्यात अशाच प्रकारे एमडी ड्रग्सचा साठा पुरविण्यात आला आहे का आणि तो कोणाच्या सांगण्यावरती आणि कुणासाठी हा एमडी ड्रग्सचा साठा धुळ्यात आला होता; याचा पुढील तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागासह धुळे पोलीस करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : हवामान बदलामुळे धाराशिव जिल्ह्यामध्ये आंबा उत्पादक शेतकरी अडचणीत

मोठी बातमी! ठोकून काढू, कापून टाकू...ठाकरेंच्या दिग्गज शिलेदाराला धमक्यांचे फोन, थेट नंबरच सांगितला

Gold Rate Today: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोनं स्वस्त, प्रति तोळा इतक्या रुपयांवर आले, वाचा २२ अन् २४ कॅरेटचे दर

Mangalsutra Designs: साडीच नाही तर जीन्स-टॉपवरही दिसेल स्टायलिश! पाहा 'इंडो-वेस्टर्न' मंगळसूत्रांचे 5 युनिक पॅटर्न्स

LPG News Rules: गॅस सिलिंडरच्या नियमात मोठे बदल, आता शहरात २५ दिवसांत LPG मिळणार, तर ग्रामीण भागात...

SCROLL FOR NEXT