मण्यार साप 
महाराष्ट्र

घराच्या भिंतीवर मण्यार जातीचा साप..सर्वजण आले अंगणात

घराच्या भिंतीवर मण्यार जातीचा साप..सर्वजण आले अंगणात

भूषण अहिरे

धुळे : रात्रीची वेळ असताना घराच्या भिंतीवर मण्यार जातीचा विषारी सर्प निदर्शनास आला. सापाला पाहून सर्वांच्‍या अंगाचा थरकाप उडाला अन्‌ सारेजण बाहेर अंगणात आले. अशात सर्पमित्राने भिंत खोदून सापाला मोठ्या शिताफीने पकडले. यानंतर सर्वांच्‍या जीवात जीव आला. (dhule-news-Manyar-snake-on-the-wall-of-the-house-everyone-came-in-the-yard)

सांगली येथे दोघा सख्या बहिण भावांना मण्यार जातीच्या विषारी सापाने दंश केल्याने मृत्यू झाल्याची घटना समजल्यानंतर या दुर्दैवी घटनेमुळे सगळीकडून हळहळ व्यक्त केली जात आहे. अशात धुळ्यातील साक्री तालुक्यातील पिंपळनेर येथे देखील मण्यार साप एका मातीच्या घराच्या भिंतीवर आढळून आला. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. परिसरातील नागरिकांनी तात्काळ सर्प मित्रांना या घटनेची माहिती दिली.

भिंत पाडून पकडला साप

सर्प मित्रांनी तब्बल पाऊण तासाच्या अथक प्रयत्नानंतर घराची भिंत पाडून मण्यार या विषारी जातीच्या सापाला पकडल्याने परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. सर्प मित्रांनी मोठ्या शिताफीने पकडलेल्या मण्यार जातीच्या विषारी सर्पाला शहरापासून दूर असलेल्या जंगली भागात त्याच्या नैसर्गिक अधिवासामध्ये सोडून मण्यार जातीच्या सापाला जीवनदान दिले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dal Vada Recipe: संध्याकाळच्या नाश्त्याला बनवा कुरकुरीत डाळ वडा; सोपी रेसिपी वाचा

Maharashtra Elections Result Live Update: ठाकरे गटाच्या किशोरी पेडणेकर विजयी

Nikki Tamboli Video : बिग बॉस फेम निक्की तांबोळीच्या डोळ्याला दुखापत; हॉस्पिटलबाहेर बॉयफ्रेंडसोबत दिसली, नेमकं झालं काय?

Cotton One Piece: फिरायला किंवा ऑफिससाठी कॅज्यूल लूकसाठी 'हे' वनपिस ड्रेस नक्की ट्राय करा

मुंबईत ठाकरेंचा पराभव होताच नारायण राणेंची पहिली प्रतिक्रिया; नितेश राणे म्हणाले, आता पाकिस्तानात जा!

SCROLL FOR NEXT