धुळे : देशावर आपले नितांत प्रेम असेल तर जवान बनून सीमेवर जात देशविरोधी कारवाई करणाऱ्यांशी झुंज द्यावीच लागते असे नाही; तर ती भक्ती आपल्या छोट्यातल्या छोट्या कामातूनही साध्य करता येऊ शकते. याचेच जिवंत उदाहरण म्हणजे शिरपूर (Shirpur) तालुक्यातील त-हाडी येथील रामदास धोबी. (dhule news man He has been ironing the national flag for 28 years)
मागील 25 ते 28 वर्षांपासून राष्ट्रध्वजाची (तिरंगा झेंडा) (National Flag) मोफत इस्त्री करून देत असल्याने रामदास धोबी या देशभक्तीचे कौतुक जिल्ह्याभरातून केले जात आहे. रामदास धोबी यांनी आतापर्यंत ३०० पेक्षा अधिक राष्ट्रध्वज कुठल्याही प्रकारचा मोबदला न घेता स्वच्छ करून ईस्त्री करून दिले आहेत. आधीच हा व्यवसाय १०, ५ रुपये हे कपडे स्वच्छ व ईस्त्री करून जमवले जातात. परंतु अशा तुटपुंजा आणि अल्पशा पैशांवर हा व्यवसाय करतानादेखील अशा पद्धतीने देशभक्ती दाखविणे खऱ्या अर्थाने देशभक्तांचे अनोखे उदाहरण म्हणावे लागेल. परिसरातील नागरिकांना देखील रामदास धोबी यांच्या कामाचा अभिमान वाटत असल्याची भावना परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.