धुळे : विविध योजनांचे आमिष दाखवून गुंतवणूक करण्यास भाग पाडले. मात्र मुदत पूर्ण होऊनदेखील (Dhule) पैसे न देता प्रतापपूर (ता. साक्री) येथील वृद्धेची पाच लाखांत फसवणूक (Fraud) झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी सिट्रस चेकईन कंपनीचालकासह पाच जणांविरुद्ध पिंपळनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. (Latest Marathi News)
प्रतापपूर (ता. साक्री) येथील कस्तुराबाई फकिरा गांगुर्डे (वय ७९) यांनी याबाबत पोलिसात तक्रार दिली आहे. सिट्रस चेकईन कंपनीचे चालक ओमप्रकाश बसंतलाल गोयकर, प्रकाश गणपत उत्तेकर, नटराजन वेंकटरामण, नारायण शिवराम कोटणीस (रा. सिट्रस चेकईन लि. १६.१९, शिल्पीन सेंटर पहिला मजला, ४० जीडी, आंबेडकर मार्ग, वडाळा, मुंबई) व कंपनीचालक देवीदास दौलत महाले (रा. दौलत बिल्डिंग, सटाणा रोड, पिंपळनेर) यांनी (Police) कस्तुराबाई यांचा विश्वास संपादन करीत व लेखी आश्वासन देऊन विविध योजनांमध्ये आमिष दाखविले. गुंतवणूक करण्यास भाग पाडले.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
कस्तुराबाई यांनी क्रिस्टल ऑप्शन कोम्बो प्लॅनची मुदत सहा वर्षे अशा प्लॅनअंतर्गत पाच लाख १०० रुपयांची गुंतवणूक केली. मात्र या प्लॅनसाठी निवडलेली मुदत पूर्ण होऊनसुद्धा संबंधितांकडून रक्कम परत करण्यात आली नाही. शिवाय रक्कम देण्यास टाळाटाळ करीत फसवणूक केली, अशी तक्रार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.