Dhule News Saam tv
महाराष्ट्र

Dhule News : खून खटल्यातील १४ आरोंपींना जन्मठेप; धुळे न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल

Dhule News : धुळे तालुका पोलीस ठाण्यांत खुनाचा गुन्हा दाखल झाल्यावर १४ आरोपीं विरोधात धुळे जिल्हा न्यायालयांत कामकाज चालले होते.

भूषण अहिरे

धुळे : धुळे जिल्ह्यात सात वर्षांपूर्वी दोन जणांवर हल्ला चढवत मारहाण केली होती. यात दोघांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात १४ जण आरोपी होते. या १४ ही आरोपीना जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. (Dhule) धुळे न्यायालयाने हा ऐतिहासिक निर्णय दिला असून तब्बल सात वर्षांनंतर (Court) मृतांच्या कुटुंबाला न्याय मिळाला आहे. (Latest Marathi News)

धुळे तालुक्यातील अनकवाडी येथील सरपंच पदाचा वाद आणि राजकिय वैमनस्यातून दोन गटात वाद निर्माण झाला होता. या वादतून त्यावेळचे सरपंच पितांबर दौलत चव्हाण (वय ५५) व त्यांचा मुलगा पुथ्वीराज पितांबर चव्हाण (वय १८) या दोघांवर जिवघेणा (Crime News) हल्ला झाला होता, या घटनेत सरपंच पितांबर चव्हाण यांचा मृत्यु झाला होता. या प्रकरणी धुळे तालुका पोलीस ठाण्यांत खुनाचा गुन्हा दाखल झाल्यावर १४ आरोपीं विरोधात धुळे जिल्हा न्यायालयांत (Court Judge) कामकाज चालले होते.  

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

कुटुंबियांना न्याय  
सदर खून खटल्याच्या कामकाजा दरम्यान धुळे न्यायालयाने सरकारी वकिलाची साक्ष ग्राह्य धरत या खटल्यातील १४ आरोपींना एकसोबत जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. महाराष्ट्रात एकाच वेळेस गुन्हयातील सर्व १४ आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यांचा हा दुर्मिळ व ऐतिहासीक निकाल मानला जात आहे. यामुळे कुटुंबाला न्याय मिळाला आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kidney Health: किडनी निकामी झाल्यास त्वचेवर दिसतात हे ६ गंभीर बदल, वेळीच व्हा सावध

राज्यात 21 दिवसांत 50 भूकंप; दोनच जिल्ह्यांमध्ये का होतोय वारंवार भूकंप?

महामार्गावर ४ वाहनांचा विचित्र अपघात; तरूण उद्योजकासह दोघांनी जीव गमावला, १८ सेकंदाचा VIDEO बघून थरकाप उडेल!

Manoj Jarange: 29 ऑगस्टला मराठ्यांचं आंदोलन मुंबईत? अवैध दाखल्यांमुळे जरांगेंचा इशारा, जरांगे पुन्हा सरकारची डोकेदुखी वाढवणार?

Pune Municipal Corporation: पुणेकरांचे 254 कोटी खड्ड्यात; महापालिका-कंत्राटरांच्या अभद्र युतीतून लूट?

SCROLL FOR NEXT