leopard
leopard  Saam tv
महाराष्ट्र

पाण्याच्या शोधात आलेला बिबट्या पडला विहिरीत

भूषण अहिरे

धुळे : साक्री तालुक्यातील दहिवेल परिसरामध्ये गेल्या कित्येक दिवसांपासून थैमान घालणारा बिबट्या पाण्याच्या शोधामध्ये विहिरीत पडल्याची घटना उघडकीस आली आहे. रात्रीच्या वेळी हा बिबट्या विहिरीत पडला असावा असा अंदाज परिसरातील नागरिकांतर्फे बांधण्यात येत आहे. (dhule news leopard in search of water fell into a well)

गेल्या काही दिवसापासून संपूर्ण परिसरामध्ये शेतकरी या बिबट्याच्या (Leopard) दहशतीखाली वावरत होते. परिसरातील शेतकऱ्यांना (Farmer) बऱ्याच वेळा या बिबट्याचे दर्शन देखील झाले होते. त्यामुळे वन विभागातर्फे या बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात आलेली होती. परंतु वन विभागातर्फे (Forest Department) या संदर्भात कुठल्याही प्रकारे दखल घेतली जात नव्हती अशी खंत परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली आहे.

बाहेर येण्यासाठी धडपड

विहिरीत पडलेला बिबट्या विहिरीच्या बाहेर येण्यासाठी धडपड करीत असून बाहेर येता येत नसल्यामुळे बिबट्या अधिकच चिडल्याचे बघावयास मिळत आहे. तसेच या बिबट्याला बघण्यासाठी परिसरातील नागरिकांनी देखील मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे दिसून येत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan Crime : भंगार चोरल्याने बेदम मारहाण, मारहाणीत तरुणाचा मृत्यू; कल्याण बसस्थानक परिसरातील घटना

Today's Marathi News Live : अकोल्यात बहुचर्चित हत्याकांडात एकाच कुटुंबातील तिघांना फाशीची शिक्षा

तुळजापूर: देवीच्या सोने-चांदी अपहार प्रकरणी दोषींवर तात्काळ गुन्हे दाखल करा, अन्यथा अवमान याचिका दाखल करणार : हिंदु जनजागृती समिती

Pimpri Chinchwad Hoarding Collapsed: पिंपरी-चिंचवड होर्डिंग कोसळ्याप्रकरणी कारवाई, मालक आणि स्ट्रक्चर ऑडिट करणाऱ्यांविरोधात गुन्हा

Married Before 30 Years : तिशीच्या आत लग्न न केल्यास येतील 'या' अडचणी

SCROLL FOR NEXT