पतीने पत्नीच्या डोक्यात लोखंडी कुस्सा मारून केले ठार

पतीने पत्नीच्या डोक्यात लोखंडी कुस्सा मारून केले ठार
पतीने पत्नीच्या डोक्यात लोखंडी कुस्सा मारून केले ठार

नंदुरबार : शहादा तालुक्यातील राणीपूर गावात पत्नीकडून पैसे मागण्याच्या कारणावरून दोघांत भांडण झाले. यात पतीने पत्नीच्या डोक्यात लोखंडी कुस्सा (नांगरणीसाठी वापरण्यात येणारे लोखंडी वस्तू) मारून राहत्या घरात गंभीर जखमी करून जीवे ठार (Murder) मारल्याची घटना घडली आहे. (nandurbar news husband killed his wife by hitting her on the head with an iron fist)

पतीने पत्नीच्या डोक्यात लोखंडी कुस्सा मारून केले ठार
Satara: इथं ओशाळली माणुसकी! ट्रक अपघातात चालक ठार; लाेकांनी पळवली कलिंगडं

शहादा (Shahada) तालुक्यातील राणीपूर येथील रहिवासी मुन्ना जुगला पावरा (वय 28) याने त्याची पत्नी रमीला पावरा (वय 28) हिच्याकडून पैसे मागितले. या कारणावरून दोघा पती- पत्नीत जोरदार भांडण झाले. यात मुन्ना याने रमीलाच्या डोक्यात लोखंडी (Crime News) कुश्श्याने मारून गंभीर जखमी केले. यात रमीलाचा जागीच मृत्यू झाला.

पती पोलिसांच्‍या ताब्‍यात

म्हसावद पोलीसात (Police) संजय रोहीदास पटले यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार भादंवी कलम 302 प्रमाणे खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. आरोपी पतीला अटक करण्यात आली आहे. म्हसावद पोलीसांची दंगा नियंत्रण पथक गाडीसह पोलीस कर्मचारी बंदोबस्त ठेवला आहे. गावात तणावपुर्ण शांतता आहे. घटनास्थळी शहादा उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत घुमरे, म्हसावदचे पोलीस निरीक्षक निवृत्ती पवार, तळोदाचे पोलीस निरीक्षक केलसिंग पावरा यांनी भेट दिली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com