Dhule News Saam tv
महाराष्ट्र

Dhule News : मुंबईच्या तळोदा येथून आठ महिन्याच्या बाळाचे अपहरण; शिरपूर येथे नशेत असलेल्या महिलेपासून सुटका

Dhule news : धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथील रस्त्यावर बाळाला सोबत घेऊन फिरत असलेल्या मद्यपी महिलेवर पोलिसांची नजर गेल्यावर तिच्यावर संशय आला

भूषण अहिरे

धुळे : मुंबईमधील तळोदा येथून काही दिवसांपूर्वी आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण करण्यात आल्याची घटना घडली होती. या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरु असताना धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथे एका दारूच्या नशेत फिरत असलेल्या संशयित महिलेला पोलिसांनी ताब्यात घेत तिच्याकडून बाळाची सुखरूप सुटका केली आहे. 

धुळे (Dhule) जिल्ह्यातील शिरपूर येथील रस्त्यावर बाळाला सोबत घेऊन फिरत असलेल्या मद्यपी महिलेवर पोलिसांची नजर गेल्यावर तिच्यावर संशय आला. यामुळे तिला पोलिसांनी ताब्यात घेत चौकशी केली असता तिने उडवाउडवीचे उत्तरे दिली. त्यानंतर तिने तिचे नाव व सांगितलेला सर्व पत्ता खोटा असल्याचे पोलीस (Police) तपासात निष्पन्न झाला. या नंतर पोलिसांनी यासंदर्भात बाळाचा फोटो सर्वत्र व्हायरल केल्यानंतर सदर बाळ हे मुंबई (Mumbai) येथील तळोदा येथून काही दिवसांपूर्वी त्याचे अपहरण झाल्याचे उघडकीस आले.  

पोलिसांनी या बाळाची मद्यपी महिलेकडून सुखरूप सुटका केली असून त्याच्या आई- वडिलांचा तपास सुरु आहे. आई- वडिलांची सर्व चाचपणी झाल्यानंतर या बाळाला त्यांच्या स्वाधीन करण्यात येणार आहे. पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे या बाळाचा जीव वाचला असून, या निमित्ताने मुलं पळवणारी टोळी सक्रिय असल्याचा संशय मात्र बळावला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

TMC Spilt : ममता बॅनर्जींचे २० खासदार 'नॉट रीचेबल'; भाजप मुख्यमंत्र्यांसोबत दिल्लीत गुप्त बैठक, महाराष्ट्रासारखा पक्ष फुटणार?

Empty Stomach Fruits: रिकाम्या पोटी ही फळं चुकूनही खाऊ नयेत

Hair Care: केसगळती, कोंडा आणि ड्रेयनेसला म्हणा बाय-बाय! फक्त या सवयींनी मिळतील हेल्दी केस

Maharashtra News Live Update: पुण्यातील अनधिकृत हाऊस पार्टी प्रकरणातील सर्व तरुणांच्या पालकांना पोलीस पाठवणार नोटीस

Silver Price Today: सोन्यानंतर चांदीच्या किंमतीतही मोठी घसरण, वाचा ताजे दर

SCROLL FOR NEXT