Dhule News Saam tv
महाराष्ट्र

Dhule News: सॅनिटरी पॅडचा आडून विदेशी दारूची अवैध वाहतूक; पोलिसांनी मुद्देमाल केला जप्‍त

सॅनिटरी पॅडचा आडून विदेशी दारूची अवैध वाहतूक; पोलिसांनी मुद्देमाल केला जप्‍त

भूषण अहिरे

धुळे : सॅनिटरी पॅडचा आडून गोव्याहून सुरतच्या दिशेने धुळेमार्गे विदेशी दारूची अवैधपणे वाहतूक केली जात होती. ही वाहून (Dhule) करत असलेल्‍या दोघांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने मुद्देमाला सकट मूसक्या आवळल्या आहेत. (Latest Marathi News)

गोव्याहून सुरतकडे धुळे मार्गे ट्रकमधून मोठ्या प्रमाणात विदेशी दारूची अवैधपणे वाहतूक केली जात होती. याबाबतची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या (LCB) अधिकाऱ्यांना गुप्त माहितीदारा मार्फत मिळाली होती. या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने सापळा रचला असता, संबंधित ट्रक पोलिसांना आढळून आला.

दहा लाखाची दारू जप्‍त

हा ट्रक पोलिसांनी थांबवून ट्रक चालकास विचारणा केली. मात्र यात सॅनिटरी पॅड असल्याचे ट्रक चालकाने सांगितले. याबाबत खातरजमा करण्यासाठी पोलिसांनी ट्रकची तपासणी केली असता त्यामध्ये सॅनेटरी पॅडच्या आडून मोठ्या प्रमाणात विदेशी दारूची वाहतूक केली जात असल्याचे आढळून आले आहे. या कारवाईमध्ये जवळपास दहा लाखांचा दारूचा साठा पोलिसांनी हस्तगत केला असून एकंदरीत १८ लाखांहून अधिकचा मुद्देमाल पोलिसांनी या कारवाईदरम्यान हस्तगत केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Truck Fire: राष्ट्रीय महामार्गावर धावत्या खाद्यतेलाच्या ट्रकला भीषण आग, वाहतूक विस्कळीत

जिंकलात तर यंत्रणा प्रामाणिक अन् हरलात तर फेरफार कशी? निवडणूक आयोगाच्या समर्थनार्थ १२४ IAS अधिकारी मैदानात

Blood Sugar Control Tips: ब्लड शुगर कमी करण्यासाठी दररोज किती वेळ चालावे? जाणून घ्या नियमित चालण्याचे सोपे नियम

Bay Leaf Water For Kidney Stones: किडनी स्टोनवर तेजपत्याच्या पाण्याचा घरगुती उपाय, एकदा नक्की करून पाहा

Saree Designs: महिलांनी नऊरात्रीत नेसा 9 प्रकारच्या 9 साड्या, लेटेस्ट डिझाईन्स पाहा

SCROLL FOR NEXT