Dhule News Saam tv
महाराष्ट्र

Dhule News : अवैधपणे दारूची वाहतूक; ट्रकसह मुद्देमाल शिरपूर पोलिसांनी केला हस्तगत

Dhule News : शिरपूर पोलिसांना गुप्त माहिती दारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार मध्यप्रदेशकडून अवैधपणे वाहतूक करत मोठ्या प्रमाणात दारू साठा भरलेला ट्रक शिरपूरच्या दिशेने येत असल्याची माहिती मिळाली

भूषण अहिरे

धुळे : दारू विक्री करण्यास बंदी असताना अवैधरित्या वाहतूक व विक्री सुरूच आहे. अशाच प्रकारे मध्यप्रदेशकडून शिरपूर (Shirpur) तालुक्यातील बोराडी येथे अवैधपणे वाहतूक होत असलेल्या दारू (Dhule) साठ्यावर शिरपूर पोलिसांनी कारवाई करत दारूने भरलेला ट्रक पोलिसांनी जप्त केला आहे. (Maharashtra News)

शिरपूर पोलिसांना (Shirpur Police) गुप्त माहिती दारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार मध्यप्रदेशकडून अवैधपणे वाहतूक करत मोठ्या प्रमाणात दारू साठा भरलेला ट्रक शिरपूरच्या दिशेने येत असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे शिरपूर पोलिसांनी बोराडी परिसरामध्ये सापळा रचला असता त्या ठिकाणी संबंधित ट्रक पोलिसांना आढळून आला. ट्रक चालकाने पोलिसांना दुरूनच बघून ट्रक सोडून धुम ठोकली. या ट्रकची तपासणी केली असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणात दारूचा साठा पोलिसांना आढळून आला.  

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

४९ लाखाचा दारूसाठा जप्त 

कारवाईदरम्यान पोलिसांनी विविध नामांकित कंपन्यांचे दारूचे बॉक्स या ट्रकमधून हस्तगत केले असून, जवळपास या ट्रकमध्ये ४९ लाखांहून अधिकचा दारू साठा पोलिसांच्या हाती लागला आहे. या कारवाईत जवळपास ८० लाखांहून अधिकचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला असून पुढील तपास शिरपूर पोलीस करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: प्रवीण गोयल आणि आई पूजा गोयल यांची १२ तास चौकशी

गुगलवर हत्येचे पर्याय शोधले, लोहगडवरून ढकलण्याचा सराव केला; केतन अग्रवाल खून प्रकरणाचा थरारक उलगडा

TET Exam Update : आज होणारी TET परीक्षा पुढे ढकलली, दिल्ली कनेक्शन आणि दीड कोटींचा व्यवहार; मोठी अपडेट समोर

भयंकर! ७ वर्षांची मुलगी शेजारी झोपलेली असतानाच पत्नीचा गळा चिरून खून; नंतर पतीने मेट्रोसमोर उडी मारून संपवलं आयुष्य

Health Care : महिनाभर चहा पिणे बंद केल्यास शरीरात कोणते बदल होतात? वाचा

SCROLL FOR NEXT