Dhule News Saam tv
महाराष्ट्र

अवैध सावकारी; चौघे चार मेपर्यंत कोठडीत

अवैध सावकारी; चौघे चार मेपर्यंत कोठडीत

साम टिव्ही ब्युरो

धुळे : मुद्दलासह व्याज फेडूनही सर्वसामान्य व्यावसायिकाचे आर्थिक शोषण, त्याला मारहाणीतून कर्णबधीर करणे आणि त्याचे कोट्यवधींच्या किंमतीचे घर कवडीमोल किमतीत बळकविण्याच्या प्रयत्नातील चौघा अवैध सावकारांना जिल्हा न्यायालयाने चार मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. अवैध सावकारांमुळे त्रस्त नागरिकांनी एसपी ऑफिसमधील आर्थिक गुन्हे शाखेशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिस (Police) प्रशासनाने केले. (Dhule news Illegal lending Four to custody until)

पोलिस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील यांच्या भक्कम पाठबळामुळे आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक हर्षवर्धन बहिर यांनी शिवसेनेचा (Shiv Sena) पदाधिकारी बबन मधुकर थोरात (रा. मनमाड जीन, पारोळा रोड, धुळे) याच्यासह प्रमोद काशिनाथ वाणी ऊर्फ आबा वाणी (रा. वलवाडी, देवपूर), जितेंद्र बाबुराव वाघ (रा. माधवपुरा, रामभाऊ दाढीवाला खुंट, चर्नी रोड), नीलेश हरळ (रा. अभय कॉलेजजवळ) यांच्या अटकेची धाडसी (Dhule News) कारवाई केली.

येथील गल्ली क्रमांक सहामधील डॉ. शेंद्रे मास्तर हाडांचा दवाखान्याशेजारील तक्रारदार गुरूकृपा इलेक्ट्रिकल्स व डेकोरेटर्सचे मिनेश महेश्वर बोडस (वय ४३) यांना संशयित वाणी, वाघ, हरळ, थोरात यांनी त्रास दिला. मारहाणीत बोडस कर्णबधिर झाले. तक्रारदाराकडून जबरदस्तीने प्रती दहा ते पंधरा टक्‍के महिना व्याज आकारणी केली. वेळोवेळी हप्ते फेडूनही चौघा अवैध सावकारांनी तक्रारदार बोडस यांचे आर्थिक शोषण केले. त्यांच्या घराची बाजारमूल्याप्रमाणे कोट्यवधींची किंमत असतानाही त्यांना दहा ते पंधरा लाख रूपये देऊ केले. या प्रकरणी आझादनगर पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये चौघा अवैध सावकारांविरोधात गुन्हा दाखल आहे.

पश्‍चिम देवपूरकडूनही कारवाई

अशाच पद्धतीने पश्‍चिम देवपूर पोलिस ठाण्याचे निरीक्षक अन्साराम आगरकर यांनीही गरोदर महिलेसह कुटुंबाला त्रास देणाऱ्या अवैध सावकारांसह चौदा जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्याचे धाडस दाखविले आहे. अशा धडक कारवाईमुळे खासगी व अवैध सावकारांचे धाबे दणाणले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime: दारू पार्टीत कडाक्याचे भांडण, रागाच्या भरात तरुणांनी मित्राच्या बायकोलाच संपवलं

Buldhana Crime: बोगस मतदाराला पोलिसाच्या ताब्यातून सोडवलं, आणला सरकारी कामात अडथळा; आमदाराच्या मुलासह ४ जणांवर गुन्हा दाखल

Local Body Election: मतदानाआधी पिंपळपारमध्ये पैसे वाटप,निलेश राणेंचा भाजपवर पैसे वाटपाचा आरोप

Maharashtra Nagar Parishad Live : जालना जिल्ह्यातील नगरपालिका मतदान टक्केवारी

Kalyan News: शहरात एकाच नंबरच्या दोन रिक्षा; दंड ठोठावल्यानंतर झाला कल्याणमधील बनावट नंबरप्लेटचा पर्दाफाश

SCROLL FOR NEXT