Dhule Heavy Rain
Dhule Heavy Rain Saam tv
महाराष्ट्र

साक्री तालुक्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस; पिकांसह घरांचे नुकसान

भूषण अहिरे

धुळे : साक्री तालुक्यामध्ये मध्यरात्री वादळी वाऱ्यासह व विजांच्या कडकडाटामध्ये मुसळधार पावसाने (Rain) हजेरी लावली. या वादळामुळे बहुतांश घरांवरील पत्रे उडाले असून शेती पिकांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याचबरोबर घरांची देखील पडझड झाली असून घराची भिंत अंगावर कोसळून चार ते पाच जण जखमी झाल्याची देखील माहिती उघडकीस आली आहे. (Dhule News Sakri Heavy Rain)

धुळे (Dhule) जिल्‍ह्यातील काही भागात मध्‍यरात्री झालेल्‍या जोरदार पावसामुळे (Heavy Rain) शेती पिकांचे देखील नुकसान झाले असून बहुतांश ठिकाणी रस्त्यांच्या कडेला असलेले झाडे उंदळून पडली आहेत. अधून मधून होत असलेल्या या मुसळधार पावसामुळे (sakri) साक्री तालुक्यात बहुतांश ठिकाणी यंदाच्या खरीप हंगामाच्या पिकांचे नुकसान देखील झाले आहे. यामुळे नुकसानग्रस्त ठिकाणी संबंधित लोकप्रतिनिधींनी तसेच प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी भेट देऊन नुकसानीचे पंचनामे करावेत व नुकसान भरपाई मिळवून द्यावी अशी मागणी नुकसानग्रस्तांतर्फे करण्यात येत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Railway Crime : तामिळनाडूहुन कल्याणला आलेली चोरट्यांची टोळी गजाआड; १२ गुन्हे उघडकीस

Today's Marathi News Live : हे अग्निवीर सरकार, त्यांना पेन्शनही नाही मिळणार; पटोलेंची केंद्र सरकारवर टीका

Sharad Pawar News | अजित पवार परतल्यास स्विकारणार? शरद पवारांचे मोठे विधान

Housing Tips: नवीन घरी शिफ्ट होताय; ठेवा 'या' गोष्टी काळजी

Vijay Wadettiwar News | कसाबमुळे करकरेंचा मृत्यू नाही? काँग्रेस नेते वडेट्टीवार यांचा दावा

SCROLL FOR NEXT