Girish Mahajan Eknath Khadse 
महाराष्ट्र

Girish Mahajan: खडसेंना आमच्‍या शुभेच्‍छा, त्‍यांनी वर वशिला लावून ठेवावा; गिरीश महाजनांचा टोला

खडसेंना आमच्‍या शुभेच्‍छा, त्‍यांनी वर वशिला लावून ठेवावा; गिरीश महाजनांचा टोला

भूषण अहिरे

धुळे : एकनाथ खडसे यांना जर असे वाटत असेल शिंदे-फडणवीस सरकार कोसळेल तर त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत. एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी वरती वशिला लावून ठेवावा मंत्री पदासाठी. कारण त्यांचा अपेक्षा भंग झाल्याने त्यांच्याकडून अश्या प्रकारचे वक्तव्य केली जात आहेत; असे म्हणत मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी एकनाथ खडसे यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. (Dhule News Girish Mahajan)

मंत्री गिरीश महाजन पालकमंत्री जाहीर झाल्यानंतर पहिल्यांदाच (Dhule) धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. शिरपूर (Shirpur) येथे मंत्री गिरीश महाजन त्याचबरोबर मंत्री विजयकुमार गावित (Vijaykumar Gavit) यांचा जाहीर सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी मंत्री गिरीश महाजन यांनी (NCP) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर फडणवीस– शिंदे सरकार कोसळेल; या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला आहे.

ठाकरेंच्‍या दसरा मेळाव्‍यासाठी कॉंग्रेस, राष्‍ट्रवादीचे प्रयत्‍न

शिवसेनेच्या (Shiv Sena) कार्यक्रमाला काँग्रेस, राष्ट्रवादीची साथ व काँग्रेस राष्ट्रवादीच्या कार्यक्रमाला शिवसेनेची साथ असे समीकरण सध्या सुरू असल्याचे म्हणत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला जास्त गर्दी दिसावी. यासाठी राष्ट्रवादी व काँग्रेसच्या वतीने केविलवाणा प्रयत्न सुरू असल्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी स्पष्‍ट करीत शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावर देखील महाविकास आघाडीवर टीका केली आहे. शिवसेनेचे दोन दसरा मेळावा होत असल्याने यापैकी कुणाचा दसरा मेळावा जोरदार होणार यावर भाष्य करताना मंत्री गिरीश महाजन यांनी घोडा मैदान दूर नसून लवकरच आपल्याला समजेल की कुणाचा दसरा मेळावा यशस्वी व जोरदार झाला हे लवकरात समजेल असे स्पष्ट केले आहे

शिंदेंच्‍या दसरा मेळाव्‍याला भाजपचे कुणीही जाणार नाही

एकनाथ शिंदे यांच्या दसरा मेळाव्याला भाजपाच कुणीही जाणार नसल्याचे यावेळी शिंदे फडणवीस सरकारमधील मंत्री गिरीश महाजन यांनी स्पष्ट केले आहे. दसरा मेळाव्यात यापूर्वी देखील भाजपच कुणी गेले असल्याचे आढळलेले नाही. त्यामुळे यंदा देखील शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात भाजपच कोणी जाणार नसल्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी स्पष्ट केले असून उपमुख्यमंत्री देवेंद्र व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात काही ठरलं असेल तर मला कल्पना नसल्याचे देखील महाजन यांनी स्पष्ट केले आहे

खडसेंनी आरोप केले म्‍हणून बोलावे लागले

मंत्री गिरीश महाजन व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कानात एकनाथ खडसे यांनी एकदा भेटून मिटवून घेऊया; या वक्ताव्यावर घुमजाव केल्यावर मंत्री गिरीश महाजन यांनी उत्तर देत मग एकनाथ खडसे यांनी आमच्या कानात येऊन काय सांगितले. एकदमच भाषण संपल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मला दोघांना ऐकू येईल अशाप्रकारे जवळ येऊन त्यांनी जे सांगितलं ते मी स्पष्ट केले आहे. आमच्यात काय बोलणं झालं हे मला सांगण्याची इच्छा नाही. परंतु ते ज्या प्रकारे आमच्यावर टीका करतात. त्यामुळे हे बाहेर सांगावे लागलं असे देखील मंत्री गिरीश महाजन यांनी स्पष्ट केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mandale to Chembur Metro : मुंबईकरांची प्रतिक्षा संपणार; मंडाळे ते चेंबूर मेट्रो महिन्याच्या अखेरीस सुरु होण्याची शक्यता | VIDEO

Teachers Salary: दीड लाख शिक्षकांचा पगार थांबणार; सुप्रीम कोर्टानंतर शिक्षण विभागाकडूनही कोंडी?

Pitru Paksha 2025: पितृपक्षात कोणत्या वस्तू खरेदी करू नये?

Golden Man Crime : पुण्यासारखं पनवेलमध्येही गँगवॉर, गोल्डमॅन अन् म्हात्रे भिडले, १४ आरोपींवर गुन्हा, वाचा नेमकं प्रकरण

Ladki Bahin Yojana: लाडकीसाठी खुशखबर, ऑगस्टचे ₹१५०० खात्यात खटाखट येणार, सरकारने उचलले मोठं पाऊल

SCROLL FOR NEXT