धुळे : शहरामध्ये काल दुपारच्या सुमारास पाच कंदील परिसरामध्ये कपडा मार्केटला आग लागण्याची घटना घडली. या आगीत जवळपास 50 हून अधिक दुकाने आगीच्या भस्मस्तानी गेल्याने दुकान मालकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. गेल्या आठ ते नऊ महिन्यांमध्ये सलग दुसऱ्यांदा ही घटना घडल्याने नुकसानग्रस्त व्यापाऱ्यांनी पालिका प्रशासनावर या घटनेचे खापर फोडले आहे. धुळे महानगरपालिका (Dhule Corporation) महापौर प्रदीप कर्पे यांनी व्यापार्यांचे सर्व आरोप फेटाळत उलट या व्यापाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळेच ही घटना घडली असल्याच स्पष्ट केले आहे. (dhule news Fire in the clothing market allegations between corporations and traders)
गेल्या आठ ते नऊ महिन्यांपूर्वी धुळे शहरातील पाच कंदील परिसरात असलेल्या कपडा मार्केटमध्ये भीषण आग (Fire) लागल्याची घटना उघडकीस आली होती. त्यानंतर मंगळवारी पुन्हा एकदा त्याच घटनेची पुनरावृत्ती झाल्याचे बघावयास मिळाले. आगीच्या घटनेमध्ये जवळपास 50 हून अधिक दुकाने जळाल्याने यामध्ये मोठ्या प्रमाणात कपडा व्यापाऱ्यांच्या मालाचे नुकसान झाले आहे. या सर्व घटनेला पालिका प्रशासन जबाबदार असल्याचे नुकसानग्रस्त व्यापाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
त्या आगीनंतर ठोस उपाय नाही
नऊ महिन्यांपूर्वी या घटनेमुळे मोठ्या प्रमाणात कपडा व्यापाऱ्यांचे नुकसान झाले होते. त्यानंतर पालिका प्रशासनातर्फे कुठल्याही प्रकारची ठोस उपाय करण्यात आली नसल्यामुळे तो दुसऱ्यांदा पुन्हा या आगीच्या घटनेला नागरिकांना व व्यापाऱ्यांना सामोरे जावे लागले; असल्याचे नुकसानग्रस्त व्यापाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
हातगाडी धारकांचा अडथळा
आगीची घटना घडल्यानंतर अग्निशमन विभागातर्फे आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न करण्यात आले. परंतु ही आग विझवत असताना जुना आग्रा रोड येथे मोठ्या प्रमाणात फळ विक्रेते त्याचबरोबर हातगाडी धारक असल्यामुळे त्या ठिकाणी (Dhule News) झालेल्या गर्दीमुळे संबंधित अग्निशमन विभागाच्या जवानांना आग विझवण्यात मोठे अडथळे निर्माण झाले. हातगाडी धारकांना पालिका प्रशासनातर्फे काही दिवसांपूर्वी रस्त्यावर हात गाडी न लावण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानंतर पालिका प्रशासनातर्फे कुठल्याही प्रकारची ठोस भूमिका घेण्यात न आल्यामुळे अग्निशमन विभागाच्या जवानांना या हातगाडी धारकांच्या गर्दीमुळे आग विझविण्यात मोठे अडथळे निर्माण झाले असल्याचे म्हणत संबंधित नुकसानग्रस्त व्यापाऱ्यांनी पालिका प्रशासनाच्या कार्य प्रणालीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.
महापौरांनी खोडले आरोप
यासंदर्भात पालिका प्रशासनातर्फे धुळे महापालिकेचे महापौर प्रदीप करपे यांनी सर्व आरोपांना खोडुन काढत पालिका प्रशासनातर्फे आग विझविण्याचे सर्वतोपरी प्रयत्न करण्यात आले असल्याचा दावा केला. तर या व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले असल्यामुळे अग्निशमन विभागाच्या जवानांना आग विझवण्यामध्ये मोठे अडथळे निर्माण झाले असल्याचे म्हणत महापौरांनी सदर घटनेचे खापर संबंधित व्यापाऱ्यांवर फोडले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.