Dhule News
Dhule News Saam tv
महाराष्ट्र

MSRTC Bus: मलकापूरच्‍या दुर्घटनेची पुनरावृत्तीची भीती; अनेक बसेसचे पत्रा फाटलेले

भूषण अहिरे

धुळे : बुलढाण्याच्या मलकापूर येथे एसटीचा पत्रा बाहेर आल्याने पोलीस भरतीची प्रॅक्टिस करणाऱ्या दोन तरुणांचे हात कापून मोठी दुर्घटना महिनाभरापूर्वी घडली होती. त्यानंतर देखील परिवहन विभागाला (MSRTC) जाग आली नसल्याचे दिसून येत आहे. धुळ्यात (Dhule) देखील बहुतांश बसेसची परिस्थिती अत्यंत दयनीय झालेली असून बऱ्याच बसेसचे पत्रे फाटून बाहेर आले आहेत. (Live Marathi News)

गरिबांची लालपरी म्हणून ओळख असलेल्या एसटी बसची (St Bus) सध्या अत्यंत दयनीय अवस्था झाली असल्याचे दिसून येत आहे. महिनाभरापूर्वी बुलढाण्याच्या मलकापूर (Malkapur) येथे एसटीचा पत्रा फाटून बाहेर आल्याने दोन युवकांचे हात कापून मोठी दुर्घटना घडली होती. या धक्कादायक दुर्घटनेमधून देखील परिवहन विभागाला जाग आली नसल्याचेच दिसून येत आहे.

धुळ्यातील बहुतांश एसटी बसेचे पत्रे फाटून बाहेर आले असल्याचे दिसून येत आहे. अशीच काहीशी परिस्थिती संपूर्ण राज्यभरातील एसटी बसेसची झाली आहे. बुलढाण्याच्या मलकापूर येथील घटनेची पुनरावृत्ती धुळ्यात देखील होण्याची भीती आता प्रवास करणाऱ्या प्रवाशांना तसेच नागरिकांना वाटू लागली आहे. मलकापूरची पुनरावृत्ती होण्याची वाट परिवहन विभाग बघत आहे का? असाच काहीसा प्रश्न खराब झालेल्या एसटी बसेसकडे बघितल्यानंतर वाटू लागला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ICC Champions Trophy: 'टीम इंडियाला पाकिस्तानात यावंच लागेल, अन्यथा...' माजी पाकिस्तानी खेळाडूची वॉर्निंग

Kalyan Crime News: तहान लागल्याने पाणी प्यायला गेली, नराधमानं संधी साधली; कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

India's Smallest Village: भारतातील सर्वात लहान गाव तुम्हाला माहिती आहे का?

Jayant Patil News : भाजपचे इंजिन बंद पडल्यामुळे मनसेचे इंजिन सोबत घेतले; जयंत पाटील यांची खोचक टीका

Today's Marathi News Live : उत्तर मुंबई पियुष गोयल यांची भव्य रॅली; महायुतीचे हजारो कार्यकर्ते रॅलीत सहभागी

SCROLL FOR NEXT