बीड : बीडच्या आष्टी तालुक्यातील ढगफुटीने उध्वस्त झालेल्या पिकांसह जमिनी वाहून गेल्यात. उभी पिकं उध्वस्त झाले. विशेष म्हणजे शेतकऱ्यांने (Farmer) उभ्या केलेल्या पोल्ट्री फार्ममधील देखील जवळपास 5 हजार कोंबड्या वाहून गेल्या आहेत. तरी देखील प्रशासन शेतकऱ्यांपर्यंत पोहचले नव्हते. याबाबत(Beed News) साम टिव्हीने बातमी प्रसारीत केली. साम टीव्हीच्या बातमीनंतर प्रशासनाला जाग आली असून जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा हे स्वतः नुकसानग्रस्त शेताच्या बांधावर पोहचले आहेत. (Letest Marathi News)
जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी (Ashti) आष्टी तालुक्यातील ब्रम्हगांव येथे शेतकऱ्यांच्या बांधावर चिखल तुडवत जाऊन नुकसान झालेल्या भागातील पिकांची पाहणी करुन शेतकऱ्यांशी संवाद साधला. कुजलेले (Soybean) सोयाबीन पिक हातात घेऊन शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेत तुम्ही एकटे नाहीत. शासन प्रशासन तुमच्या पाठीशी आहे म्हणत नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना धीर दिला.
पंचनाम्यांचे दिले आदेश
शेतीचे नुकसान झालेले पाहून जिल्हाधिकारी शर्मा यांनी नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा; असे आदेश यावेळी दिले आहेत. यावेळी आमदार बाळासाहेब अजबे यांच्यासह शेतकरी, अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.