Dhule News Saam tv
महाराष्ट्र

Dhule News: मला वाचवा..असा मॅसेज टाकत वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्याची तापी नदीत उडी

मला वाचवा..असा मॅसेज टाकत वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्याची तापीत उडी

साम टिव्ही ब्युरो

चिमठाणे (धुळे) : चिमठाणे (ता. शिंदखेडा) येथील रहिवासी प्रवीण विजय गवते (वय ४०) याने सुकवद- गिधाडे रस्त्यावरील तापी पुलावरून सुलवाडे धरणात उडी घेऊन (Dhule News) आत्महत्या केल्याची घटना घडली. शिंदखेडा (Shindkheda) पोलिस ठाण्यात मृताच्या साडूने दिलेल्या खबरीनुसार आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. (Live Marathi News)

मृत प्रवीण गवते यांचे साडू नितीन विश्राम सांगळे यांनी शिंदखेडा पोलिस ठाण्यात दिलेल्या माहितीनुसार लहान साडू प्रवीण गवते वीज वितरण कंपनीत (MSEDCL) ऑपरेटर म्हणून नोकरीस आहेत. त्यांची नेमणूक बाळदे (ता. शिरपूर) येथील उपकेंद्रावर असून, ते परिवारासह शिरपूर येथे बालाजीनगरात वास्तव्यास आहेत. गिधाडेच्या पुलावर प्रवीण गवते यांची मोटारसायकल व चपला पडलेल्या आहेत व ते कुठेही दिसत नाहीत; अशी माहिती त्यांना मिळाली. मासेमारी करणारे व पोहणाऱ्यांनी त्यास बाहेर काढले व शिंदखेडा ग्रामीण रुगणालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. कुंदन वाघ यांनी मृत घोषित केले. पोलिस निरीक्षक सुनील भाबड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक चेतन बोरसे तपास करीत आहेत.

व्हॉट्सॲप ग्रुपवर मेसेज

मृत प्रवीणने चिमठाणे येथील श्री सिद्धिविनायक व्हॉट्सॲप ग्रुपवर दोन वाजून ५१ मिनिटांनी एक पोस्ट टाकली आहे. त्यात त्याने लिहिलेस की माझ्या मागे चार- पाच गुंड पोरे लागली आहेत. ते सर्व अनोळखी आहेत, मला काही सुचत नाही. माझ्यासोबत तीन लाख रुपये आहेत. मी कसे तरी मला वाचविण्याचा प्रयत्न करत आहे. मला मदत..’ असा मेसेस टाकला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Apurva Nemlekar: 'रात्रीस खेळ चाले' फेम 'शेंवता'ची सिंगापूर ट्रिप, खास व्यक्तीसोबतचे फोटो केले शेअर

Maharashtra News Live Updates: शिवडी विधानसभेत ठाकरे गटाची बाईक रॅली

Rahul Gandhi: एक है तो सेफ है...., मोदी सरकारच्या नाऱ्याची राहुल गांधींनी उडवली खिल्ली, थेट व्हिडीओ दाखवला

Amit Shaha News : सत्ता स्थापनेच्या बैठकीत शरद पवार होते? अमित शहा यांचा मोठा खुलासा, पाहा Video

Tuljabhavani Mandir : तुळजाभवानी मंदिराला पावणेतीन कोटींचे उत्पन्न; भाविकांमार्फत ६५३ ग्रॅम सोने व १३ किलो चांदी अर्पण

SCROLL FOR NEXT