Dhule Police
Dhule Police saam tv
महाराष्ट्र

Crime News: गावठी पिस्तूल व जिवंत काडतुसे बाळगणाऱ्याच्या आवळल्या मुसक्या

भूषण अहिरे

धुळे : पोलिसांना मिळालेल्‍या गुप्‍त माहितीवरून गावठी कट्टा व जिवंत काडतुसे सोबत बाळगणाऱ्या इसमास पोलिसांनी ताब्‍यात घेतले आहे. आगामी सण-उत्सवाच्‍या पाश्‍र्वभुमीवर ही कारवाई झाल्‍याचे सांगितले जात आहे. दहशत माजविण्याच्या हेतूने सोबत असलेली पिस्‍तूल व काडतुसे हस्‍तगत केली आहेत. (dhule news Embarrassed villagers carrying pistols and cartridges)

आगामी सण-उत्सव लक्षात घेता धुळे (Dhule) जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक प्रवीण कुमार पाटील यांनी नागरिकांना निर्भयपणे सण उत्सव साजरे करता यावे, यासाठी आदेशित केले आहे. या अनुषंगाने धुळे शहर पोलीस (Dhule Police) ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांना गुप्त माहितीदारा मार्फत मिळालेल्या माहितीनुसार धुळे शहरातील मनमाड जीन पाण्याच्या टाकी समोर राहणाऱ्या आदीत भीमशंकर हा इसम आपल्यासोबत गावठी कट्टा व जिवंत काडतुसे घेऊन दहशतीच्या हेतूने फिरत असल्याची माहिती मिळाली.

सापळा रचत पकडले

सदर माहितीच्या आधारे धुळे शहर पोलिसांनी एक पथक पाठवून याबाबत शहानिशा करून या इसमास धुळे शहरातील ज्योती टॉकीजच्या बाजूला असलेल्या विजय व्यायाम शाळेसमोर सापळा रचून पकडले. या इसमाच्या ताब्यात एक गावठी बनावटीचे अग्निशस्त्र आढळून आले असून त्यासोबत दोन जिवंत कडतुस देखील पोलिसांना (Police) आढळून आले आहेत. ज्याची बाजारामध्ये किंमत जवळपास 26 हजार रुपये मानली जात असून या तरुणास पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास धुळे शहर पोलिस करीत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cibil Score: कमी झालेला सिबिल स्कोअर ७०० पार कसा कराल? 'या' टिप्स सुधारतील तुमचा स्कोअर

Ankita Lokhande: हृदयस्पर्शी कॅप्शनसह अंकिता लोखंडेने पतीसोबतचा रुग्णालयातील फोटो केला शेअर

Maharashatra Elction: कोकणात ठाकरे विरुद्ध ठाकरे लढाई; उद्धव आणि राज ठाकरेंच्या सभांचा झंजावात

Petrol वर नाही CNG वर धावणार Bajaj ची नविन बाईक, Platina पेक्षा देणार जास्त मायलेज

Poco X6 5G नविन अवतारात लॉन्च झाला, मिळणार जबरदस्त फीचर्स

SCROLL FOR NEXT