Dhule News Saam tv
महाराष्ट्र

Dhule News : धुळ्यात आक्षेपार्ह पत्रक वाटप; निवडणूक आयोगाकडून गुन्हा दाखल

Dhule News : विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता थांबला आहे. मात्र सुरवातीपासूनच उमेदवार व कार्यकर्त्यांकडून करण्यात येत असलेल्या प्रचारावर निवडणूक आयोगाचे लक्ष आहे

भूषण अहिरे

धुळे : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धुळे शहरात आक्षपार्ह पत्रक करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. विशिष्ट समाजाबाबत वादग्रस्त पोस्टर वाटप करण्यात आल्याचे निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आल्यानंतर अज्ञात व्यक्तीविरोधात धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

विधानसभा निवडणुकीचा (Vidhan Sabha election) प्रचार आता थांबला आहे. मात्र सुरवातीपासूनच उमेदवार व कार्यकर्त्यांकडून करण्यात येत असलेल्या प्रचारावर निवडणूक आयोगाचे लक्ष आहे. दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कुठल्याही प्रकारची वादग्रस्त विधान व पोस्ट न करण्याचे आवाहन निवडणूक अधिकाऱ्यांतर्फे करण्यात आले आहे. यावर जिल्हा प्रशासन व निवडणूक आयोगाचे लक्ष असून वादग्रस्त पत्रक वाटप केल्यासंदर्भात निवडणूक आयोग आता ॲक्शन मोडमध्ये आल्याचे दिसून येत आहे. 

दरम्यान धुळे (Dhule News) शहरात आक्षेपार्ह पत्रक वाटप करण्यात येत असल्याचा प्रकार समोर आला आहे. यात विशिष्ट समाजाबाबत वादग्रस्त पोस्टर वाटप करण्यात आल्याचे निवडणूक आयोगाच्या निदर्शनास येताच अज्ञात व्यक्तीविरोधात धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस प्रशासनास पत्रक वाटपा संदर्भात तपासाचे व सखोल चौकशीचे निवडणूक विभागातर्फे आदेश देण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sanjay Raut: अनिल देशमुखांवरील हल्ल्याप्रकरणी संजय राऊत संतापले, थेट फडणवीसांवर केले आरोप

Jalgaon News : जळगावात ठाकरे गटाला मोठा धक्का; जिल्हाप्रमुख शिंदे गटाच्या वाटेवर

Keerthy Suresh Wedding: साऊथच्या अभिनेत्रीचं ठरलं, बॉयफ्रेंडसोबत करणार लग्न, कोण आहे कीर्तीचा होणारा नवरा?

Most Dangerous Plants: जगातील सर्वात धोकादायक वनस्पती कोणती?

Shrinivas Pawar: शरयू मोटर्स तपासणीनंतर श्रीनिवास पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले - 'अजित पवार अस्वस्थ झालेत'

SCROLL FOR NEXT