महाराष्ट्र

जिल्हा परिषद पोटनिवडणुक; पंधरा गटातून १०७ तर तीस गणातून १८० उमेदवारी अर्ज

जिल्हा परिषद पोटनिवडणुक; पंधरा गटातून १०७ तर तीस गणातून १८० उमेदवारी अर्ज

भूषण अहिरे

धुळे : जिल्हा परिषदेच्या होऊ घातलेल्या पोटनिवडणुकीसाठी पंधरा गटातून १०७ तर ३० गणातून तब्बल १८० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. उमेदवारी अर्ज माघार घेण्यासाठी २७ सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आली आहे. (dhule-news-dhule-Zilla-Parishad-by-elections-107-nominations-from-15-groups)

ओबीसी आरक्षणाच्या कारणावरून राज्यातील पाच जिल्हा परिषदांच्या पोटनिवडणुका जाहीर करण्यात आल्या आहेत. या पोटनिवडणुकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला असून येत्या ५ ऑक्‍टोबरला मतदान प्रक्रिया पार पडणार आहे; तर ६ ऑक्टोबरला निवडणुकीचा निकाल जाहीर केला जाणार आहे.

भाजपचा लागणार कस

पोटनिवडणुकीसाठी जिल्हा परिषदेतील सत्ताधारी पक्षांसह विरोधी पक्षांनी कंबर कसली असून होणाऱ्या निवडणुकीत जास्तीत जास्त उमेदवार विजयी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न सुरू झाले आहेत. धुळे जिल्हा परिषदेत भाजपची एक हाती सत्ता असून पंधरा गट आणि ३० गणांसाठी होणाऱ्या या पोटनिवडणुकीत भाजपला सर्वच जागांवर विजय मिळविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करावे लागणार आहेत.

माघारीनंतर चित्र होणार स्‍पष्‍ट

निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात आली असून पंधरा गटांसाठी १०७ तर तीस गणांसाठी १८० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. येत्या २७ सप्टेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज माघार घेण्यासाठी मुदत देण्यात आली असून उमेदवारी अर्ज माघारी घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. धुळे तालुक्यासाठी ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची असून सर्वाधिक गट धुळे तालुक्यात आहेत. धुळे तालुक्यात ११ गटांसाठी तर आठ गणांसाठी ही पोटनिवडणूक होणार आहे. तसेच दोन माजी सभापती देखील या निवडणुकीच्या रिंगणात असून या दोन माजी सभापती पुढे विजयी होण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. यामुळे सहा ऑक्टोबरला जाहीर होणाऱ्या निवडणुकीच्या निकालात कोणत्या पक्षाला किती जागा मिळतात हे बघणे महत्त्वाचे असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: राज्यातील डाळिंबाच्या बागा टार्गेट? पुण्यातील शेतातून तब्बल ४.५ हजार किलो डाळिंब चोरीला, सोलापुरातही तशीच घटना

Maharashtra Live News Update : मंत्री पंकजा मुंडे मयत गौरी गर्जे यांच्या कुटुंबीयांच्या आज भेट घेणार

Scholarship Exam: विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी! शिष्यवृत्ती परीक्षेच्या तारखेत बदल, 'या' दिवशी होणार पेपर

ठाकरे गटाच्या खासदाराला 100 कोटींसह केंद्रीय मंत्रिपदाची ऑफर, माजी आमदाराचा गौप्यस्फोट, राजकीय वर्तुळात खळबळ

Tilachi Chutney Recipe : हिवाळ्यात खायलाच पाहिजे, तिळाची पौष्टिक आणि चवदार चटणी!

SCROLL FOR NEXT