Dhule Rural Vidhan Sabha Saam tv
महाराष्ट्र

Dhule Rural Vidhan Sabha : धुळे ग्रामीणमध्ये ठाकरे गटाला धक्का; पदाधिकाऱ्याकडून राजीनामा देत उमेदवारी

Dhule news : धुळे ग्रामीणमधून शिवसेना ठाकरे गटातर्फे उमेदवारी करण्यासाठी माळी हे इच्छुक होते. परंतु धुळे ग्रामीणमधून काँग्रेसचे विद्यमान आमदार कुणाल पाटील यांना महाविकास आघाडीतील काँग्रेसतर्फे उमेदवारी

भूषण अहिरे

धुळे : विधानसभा निवडणुकीत बंडखोरी जवळपास सर्वच मतदारसंघात होत आहे. यात धुळे ग्रामीण मतदारसंघात देखील बंडखोरी झाल्याचे समोर आले आहे. शिवसेना ठाकरे गटातर्फे नाराज हिलाल माळी यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला असल्याने महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचे पाहण्यास मिळत आहे. 

धुळे (Dhule) ग्रामीण मतदार संघात महाविकास आघाडीत बिघाडी झाली आहे. ठाकरे गटाच्या शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख हिलाल माळी यांनी पदाचा राजीनामा देत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. धुळे ग्रामीणमधून शिवसेना (Shiv sena) ठाकरे गटातर्फे उमेदवारी करण्यासाठी माळी हे इच्छुक होते. परंतु धुळे ग्रामीणमधून काँग्रेसचे विद्यमान आमदार कुणाल पाटील यांना महाविकास आघाडीतील काँग्रेसतर्फे उमेदवारी जाहीर करण्यात आल्यानंतर हिलाल माळी हे नाराज होते. 

दरम्यान उमेदवारी न मिळाल्याने नाराज असलेले हिलाल माळी यांनी आज ठाकरे गट शिवसेनेला सोडचिठ्ठी देत पदाचा राजीनामा दिला. यानंतर त्यांनी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. धुळे ग्रामीणचे मतदार आपल्याला नक्कीच मोठ्या मताधिक्याने निवडून देतील; असा विश्वास यावेळी हिलाल माळी यांनी व्यक्त केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CNG Price Hike: सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री! सीएनजीच्या दरात २ रुपयांनी वाढ; तुमच्या शहरातील दर काय? जाणून घ्या

Nutrition Tips: जाणून घ्या,नवजात बाळाच्या विकासासाठी योग्य आहार

Exit Poll Maharashtra : कागलमध्ये समरजित घाटगे मारणार बाजी? पाहा Exit Poll

Leopard Attack : बिबट्याचा महिलेवर प्राणघातक हल्ला; मुलांसह शेतात कापूस वेचणी करतानाची घटना

Satara Exit Poll: सातारा विधानसभा मतदारसंघामध्ये भाजप की शिवसेना ठाकरे गट कोण मारणार बाजी? पाहा Exit Poll

SCROLL FOR NEXT